पैश्या,
तुझा जन्म ”सावधान,सावधान…!!”या मंगल अष्टमीने झालं…
नंतरच्या काळात;
त्वा,काही सावकाराच पोट भरलस तर कोणाची झोळी खाली केलीस…
मंदीच्या काळात तू खूप आग लावण्याचं अन विजवण्याचं काम केलंय म्हणे…!!
हल्ली,पडद्याआड रूपाने लाच घेता येते आणि देतही येते…
मी ऐकलंय बुवा,
तू माणसाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधतो म्हणे…
अन,
लाचार पांढरी पट्टीदेखील…!!
तू,
कधी विक्षिप्त रूप धारण करून भन्नाट बोलतो
तर,
कधी निर्जीव मूर्तीसारखं अबोला प्राणी होतोस…
कारे रे,
तू कधी विचार केलंस;
तुझ्यामुळे किती जणांचे नाते दुरावले.
काहींवर आरोप-प्रत्यारोप झाले.
तर काही स्वर्गवासी झाली.
काही जन्मले
अन
मेलेही…
तुला; माणसासारखं, मृत्यू नाही का रे?
त्यांच्यासारखं, मातीमध्ये मिसळून जाण्यासाठी…
माणसं, मृत्यूनंतर मातृभूमीला कवटाळतात…
त्यावेळी,दोन्ही निर्जीव असतात…
माणसं, तुला इतकं प्रेम कसकाय करतात रं?
एक निर्जीव
तर
दुसरं सजीव…
खरंच… तुमचं लग्न लावावं लागतं…
सावधान,सावधान म्हणत…
अरे पैश्या,
माणसाला अंत आहे…
पण
तुला नाही का…अंत??
21/08/2018
Leave a Reply
You must be logged in to post a comment.