हृदयात लपवलेल्या भावना कालांतराने कोमेजून जातात…
शेवटी त्यांचा आक्रोश होतो…
दिशाहीन झऱ्याला पान्हा फुटल्यावर चहुदिशेला पसरतो,तश्याच या मानवी भावना पसरतात…
सर्वत्र हाहाकार करतात….
सहन केलेल्या गोष्टीना तोंड फुटतं…
शब्द बाहेर पडतात…
ते
बहिरूपी धारण करतं…
भावना,
बोराटी-हिंगोरीच्या काट्याप्रमाणे भुतकाळाला बोचतात…
वर्तमान मुका होतो…
आणि
भविष्य तळपत्या उन्हातान्हात थंड सावलीच्या शोधात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घोडं-प्रवास करतो…
काळाने मानवतेला बांधलेल्या हातकड्या नष्ट होतात…
पायावरच्या साखळ्या वितळून जातात…
त्यालाही
स्वातंत्र्य हवंय…
उंच आभाळात भरारी घ्यायचीय…
मैलोमेल चालायचं…
तहान-भुकेने व्याकुळलेल्यानं भेटायचं…
स्वप्न-स्वर्गातून वास्तविकतेमध्ये जगायचंय…
आपलेपणाचा अनुभव घ्यायचंय…
अन
दोन अश्रू मानवी मातीला अर्पण करायचंय…
आता,
पूर्णविरामाच ‘कॉमा’मध्ये रूपांतर होतंय…
जीवनाच्या,
या दुपायी रस्त्यावर;
स्वतःला सावरत,
परिस्थिला आवरत,
‘राजयोगी’ प्रवास पुन्हा सुरू होतो…!
Leave a Reply
You must be logged in to post a comment.