मी ‘बैचेन’ झालोय…
माझ्या हृदयात पेटलेल्या आगीला काही सीमा उरली नाहीये…
माझ्या
संपूर्ण देहात विचारच चक्रीवादळ सुरू झालाय…
रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये ती आग सळसळतेय…
प्रत्येक श्वासा-श्वासामध्ये आक्रोश तुडुंब भरलंय…
आवती-भोवतीच्या जंगलाला विषमतेचा वानवा लागलाय…
होय,
आज माझ्या ‘आत्मक्लेषी’ समुद्राला पूर आलाय…
काही लोकांच्या हालचाली माझ्या डोळ्याने कैद करून ठेवल्यात…
त्या लोकांपैकी पसरलेल्या आगीवर कोणी रॉकेल टाकतय,
कोणी पेट्रोल
तर
कोणी डिझेल…
ज्यांच्या हातात अग्निक्षमक दल आहे ते अजूनही निद्रेतच आहेत…
ज्वालाग्रही परिस्तिथी तंबाकुप्रमाणे माणसाला चोळतेय…
त्यांची अमानवीय वैचारिकता अनेकांचं घर उध्वस्त करतेय…
अन् मी
मानवतेच्या नावावर काळोकट्ट दगडी रूप धारण करून स्वातंत्रतेचा निर्जीव,अबोल पुतळा बनलोय…
या जळत्या जागाच दृश्य बघण्यासाठी काळाने मला 3-D चष्मा दिलंय…
सोबतीला माझ्या पौरुष्याच्या नायनाटासाठी
माझी जीभ अर्धी कापुन कुत्र्याला खायला टाकलीय…
माझ्या डोळ्यात सुरे खुपसलेत…
माझे हातकडीने हात अन साखळीने पाय बांधलेत…
आता मी तोतरं बोलतोय म्हणून ‘पागल बोज्यांची’ उपमा परिस्थितीने माझ्यावर लादलीय…
नकोय मला तुमच्या उपमा…
नकोय मला हा तुमचा अमानुष कळश…
मी
माणुसकीचा शिल्पकार
अन
स्वतंत्र विश्वाचा कर्णधार…!
मला तुम्ही ‘क्रूर’तेची लाच देऊ नको…
माझा शिरच्छेद केलात तरी तू माझ्या देहाला शांततेचे पताके उंच गगनात फडकविण्यापासून रोखू शकणार नाहीत…
म्हणूनच मी धिक्कार करतो
तुमच्या आचरणाचा…
तुमच्या लाचारपणाचा…
अन
तुमच्या विचारांचा…
घृणा वाटतेय स्वतःची…
माझ्यापासून तुम्ही दूर व्हा…
नाहीतर
तुमचा अंत इथेच करेल…
वर्तमान तुम्हाला त्याची साक्ष देईल…
अन्
इथेच तुमचा मृत्यू मी माझ्या ‘राजयोगी’ कलमाणे लिहिणं…
त्यामुळे तुम्ही दूर व्हा…
दूर व्हा…
22/12/2018
Leave a Reply
You must be logged in to post a comment.