एक वास्तविक घटना…
आज मी दाजी ला माजलगावच्या ‘योगीराज’ हॉस्पिटलमध्ये आईने पाठविलेला डब्बा देऊन अण्णाभाऊ साठे ओलांडून नवोदयचा रस्ता धरणार होतो…
त्यावेळी काही शब्द कानावर पडले आणि अचानक बोट कॅमेऱ्यावर गेलं…
मी काढलेल्या फोटोमध्ये काही विशेषता नाहीये परंतु त्या फोटोमागे माणसाच्या अनेक छटा लपून बसल्यात…
बस स्टँडकडे मी या रद्दीच्या गाड्यासोबत चलत होतो… माझ्या ऐटीत…!!
आकाशच्या कॉलमुळे पाऊलं जोरात पुढं सरकत होते. पण माझे श्रवनयंत्र पूर्णपणे काम करत होते. रद्दीवाल्या काकांच्या मागून एक गृहस्थ चालत होते. खूप घाई-गरबड होती त्यांना. काकांचीअवस्था, त्यांचं वय आणि या वाढत्या वयात भोगावी लागणारी परिस्थिती व त्यातूनच मिटणारा पोटा-पाण्याचा प्रश्न… अश्या अनेक बाबीचा विचारी बोल, त्या गृहस्थाच्या मुखातून या अपेक्षावादी रद्द्यावर झडले.
”बाबा,अजून किती काळ ही म्हातारी गाडी ढकलनार?”
आणि क्षणांतच ते गृहस्थ डोळ्याआड गेले. मी थोडा विचार केला. माझ्या कपाळावर पडलेल्या आठ्यावरुन त्या रद्दीवाल्या काकांनी एक ओळ सांगितली.
”बेटा, ही गाडी ढकलली नाही तर गाडी पुढे जात नाही…!”
मला त्यांच्या गोष्टीमध्ये काही खास वाटलं नाही म्हणून थोडं पुढे निघालो पण क्षणार्धात माझे पाऊलं जागी थांबले आणि बोटं कॅमेऱ्यावर गेली.
त्यांनी माझ्या डोक्यात प्रकाश टाकल, आणि आयुष्याचे काही महत्वपूर्ण धडे दिले.
जीवनात पुढे सरकाव लागतं… मग ती रद्दीची गाडी असो वा आयुष्याची घडी…!!आपलं पोट ,आपण आहोत त्या जागी थांबू देत नाही आणि जाणून-बुजून थांबलोत तर पोटात कावळे ओरडल्याशिवाय राहत नाहीत…त्यामुळे पुढे चलावच लागतं;लागणारच…!आयुष्याची गाडी आणि रद्दीची जोडी पुढच्या जीवनाची दिशा दाखवते.त्यांनी सांगितलं, हा गाडा एका जागी थांबला तर तो हाल-चाल करायला लागतो.नाही त्या दिशेकडे ओळाय लागतो. या दिशाहीन समुद्रात नाहीसा होतो.
आजच पाच रुपयांचं एक पेपर उद्या पाच रुपये किलो न विकला जातोय…!
तूच सांग,ही म्हातारी गाडी पुढं ढकलू की नाही?
मंगळ; 18/06/2019
Leave a Reply
You must be logged in to post a comment.