वयक्तिक सत्याग्रह

नमस्कार,             मी राजेश सुंदरराव राठोड,पुण्यात शिक्षण घेणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी, महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारताचा नागरिक! मागच्या दोन-तीन महिन्यात एक वाक्य खूप गाजलं. “आपण आपल्या तोंडावरती मास्क स्वतःच्या सरंक्षणासाठी लावत नाहीये तर स्वतःच तोंड पृथ्वीला दाखवायची लायकीसुद्धा राहिली नाही,म्हणून आपण मास्क लावतोय.” सुरुवातीला ‘निसर्गाने’ आपली लायकी काढली म्हणून थोडं वाईट वाटलं. पण आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण…

By

min read


नमस्कार, 

           मी राजेश सुंदरराव राठोड,पुण्यात शिक्षण घेणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी, महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारताचा नागरिक! मागच्या दोन-तीन महिन्यात एक वाक्य खूप गाजलं. “आपण आपल्या तोंडावरती मास्क स्वतःच्या सरंक्षणासाठी लावत नाहीये तर स्वतःच तोंड पृथ्वीला दाखवायची लायकीसुद्धा राहिली नाही,म्हणून आपण मास्क लावतोय.” सुरुवातीला ‘निसर्गाने’ आपली लायकी काढली म्हणून थोडं वाईट वाटलं. पण आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण केलं तर जाणवेल की आपण निसर्गाचा ऱ्यास खूप मोठ्या प्रमाणावर केलंय. निसर्गामध्ये विविध गोष्टीचा समतोल(बॅलन्स) नसल्यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागतंय. काही ठिकाणी ढगफुटी होतेय तर काही ठिकाणी अचानक पूर येतोय. मग अशा अचानक येणाऱ्या संकटांना एक सामान्य माणूस म्हणून कशाप्रकारे पुढे जायचं? किंवा असे संकट येऊ नये वा त्या संकटांचं प्रमाण आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल का? आपण पूर्णपणे निसर्गाला मात करू शकणार नाहीत पण ‘आपण आपल्या पातळीवर वर काय-काय करू शकतो?’ या अनुषंगाने मी, माझे मित्र, सामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर; आम्ही एकत्रितपणे वयक्तिक सत्याग्रहाची एक चळवळ हाती घेतली आहे, ज्यामध्ये आम्ही स्वतः प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करतोय आणि आपल्या तांड्यातल्या, सोसायटीतल्या, गावातल्या लोकांना, आपल्या मित्रांना, कुटूंबातील लहान मुलांना, नातेवाईकांना कॉल करून या वयक्तिक सत्याग्रहामध्ये सामील करत आहोत. 

            तुमच्यापैकी खूप लोकांना वाटेल की यामध्ये नवीन असं काय आहे? मी तर फटाके वाजवत नाही! मी या उपक्रमाबद्दल मित्रांसोबत बोलत असताना असं समजलं की त्यांच्यापैकी काही मित्र मागच्या पाच-सहा वर्षांपासून फटाके वाजवत नाही. मला स्वतःच अभिमान वाटतो की मागच्या नऊ वर्षांपासून फटाके वाजवत नाही. आता ही गोष्ट मी स्वतःच्या फुशारकीसाठी तुम्हांला सांगत नाहीये. असा मी एकटाच आहे अशी पण गोष्ट नाहीये तर असे अनेक लोक आहेत. 

           लक्षात घ्या, १०००-१२०० लोकांनी फटाके वाजवले नाही तर याचं परिणाम (इफेक्ट) आपल्याला जाणवणार नाही परंतु हीच गोष्ट १५-२० लाखावर गेला तर… यापासून आपल्याला फायदा काय होईल की नाही हे मी सांगू शकणार नाही पण यापासून तोटा काही होणार नाही, हे मी १०० % सांगू शकतो.

            आपल्या गावामध्ये अनेकदा रॉकेट-बॉम्ब आपल्या कडबा-सरमाड, भुसकट किंवा ऊसात देखील जाऊन पडतो. मागच्या काही वर्षात कापसाचे घर पूर्णपणे जळून जाण्याचं प्रमाण वाढलंय. वर्षभर केलेली मेहनत काही मिनिटात नष्ट होते. एवढच नाही तर फटाक्याच्या मोठ्या आवाजामुळे घरात जन्माला आलेली लहान मुलं आणि वयोवृद्ध आजी-आजोबा यांचा जीव गेला, अशा अनेक बातम्या आपण ऐकल्यात. म्हणजे फटाके आपण स्वतःच्या पैशाने खरेदी करायचं, स्वतःच आर्थिक नुकसान करायचं, आपलं स्वतःच आरोग्य खराब करून घ्यायचं, आनंदाच्या वेळी आपण आपल्याच चुकीमुळे स्वतः दुःख ओढवून घ्यायचं हे बरोबर नाहीये. आपलं कुठेतरी चुकतंय… मग 🙄 आपण आपल्या स्तरावर आपल्यासाठीच काही करू शकतो का? हो नक्कीच करू शकतो….💭 

              या संपूर्ण चळवळीमध्ये आम्ही कोणालाही फोर्स करत नाही आणि तुम्हीदेखील फोर्स करू नका. ते आपले कुटुंबातील व्यक्ती आहेत, मित्र, नातेवाईक आहेत. आपण त्यांना समजावून सांगु शकतोत, फोर्स नाही करू शकणार.

🌀ज्यांना वाटतंय की आपण इथून पुढे फटाके न वाजवता देखील दिवाळी साजरा करू शकतो, ते खरोखर कौतुकाचे पात्र आहेत. 

🌀ज्यांना फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटतच नाही, त्यांनी मागच्या वर्षी जर १०००-१२०० ₹ फटाके घेतले असतील तर यावर्षी कमीत कमी २५% ने फटाके कमी घ्या… पुढच्या वर्षी अजून २५-३०% ने कमी फटाके खरेदी करूया. 

👀 आपण अजून एक काम करू शकतो…

१०००-१२००₹ च्या फटाक्याऐवजी आपल्याला आवश्यक गोष्टी/वस्तू खरेदी करूयात. उदा,आपल्या घरातील मुलांना जर वाचनाची आवड असेल, तर त्याला चांगल्या कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह वा आत्मचरित्र आणून द्या किंवा मुलांना जर चित्रकलेची आवड असेल तर त्याला ब्रश, कलर, कॅनव्हास घेऊन द्या, जेणेकरून ते भविष्यात या गोष्टींचा वापर करू शकतील.

♻️ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फटाके वाजवायचे आहेत, त्यांनी ग्रीन(जे कमी प्रदूषण करतात) फटाके वाजवा. 

          मागच्या १०-१२ दिवसात आम्ही सर्व सामान्य लोकांनी आप-आपल्या मित्रांना कॉल करून सांगितलं आहे आणि आपल्यातील अनेक लोक, आपली चळवळ किती लोकांपर्यंत पोहोचली याबद्दल रेकॉर्ड ठेवत आहोत. त्यानुसार आज १४ ऑक्टोबर रोजी आपल्या या सत्याग्रहाला जवळजवळ २३,४०० लोक सहमत झालीत. त्यांना हा प्लॅन खूप आवडलाय. (हा आकडा अजून वाढवू शकतो) एवढच नव्हे तर आपण महाराष्ट्र सोडता गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपला वयक्तिक सत्याग्रह करत आहोत. आपल्या आरोग्यासाठी, स्वतःच्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आजच आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावं लागेल. प्रदूषणाचे(फटाके वाजवल्यामुळे) दुष्परिणाम संपुर्ण निसर्गावर तर होतचं आहे पण या सर्वामध्ये मानवजातीला(जो फटके वाजवेल आणि जो वाजवणार नाही त्यांनादेखील) आज ना उद्या खूप वाईट अवस्था होणार आहे. आज आपल्याला आपल्या चुका सुधारण्यासाठी वेळ आहे; आपण स्वतः पुढाकार घेऊन आपल्या वयक्तिक पातळीवर स्वतःची जीवनशैली बदलायला हवं. थोर पुरुष जन्माला यावं तर तो शेजारच्या घरात जन्माला यावं अशी आपली समजूत आहे. ही समजूत बदलण्याची संधी आपल्याला आहे. यासाठी थोर पुरुष घरात जन्माला यावं अस आवश्यक नाहीये तर आपण स्वतःच चांगल्या आचाराने आणि विचाराने थोर बनू शकतो. 

आज आपण झाडं लावूया, उद्या त्याची फळ मिळतील!

तुम्हांला आमच्याकडून ऍडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔 🪔 

तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला 📱9096119950 या नं. वर व्हाट्सएपद्वारे किंवा 📧 rajyogx@gmail.com यावर मेल द्वारे कळवा.

तुम्हांला आमचा पुढाकार/उपक्रम आवडला असेल तर तुम्ही स्वतः स्वतःच्या पातळीवर 💯 राबवा आणि हा मेसेज आपल्या मित्रांना, कुटूंबियांना आणि नातेवाईकांना फॉरवर्ड करा..

17 Oct 2020

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.