प्रेमवाणी

प्रेमक-प्रेयसीच्या प्रेमबोली आणि 143 हा प्रेमांक मला खूप खतरनाक वाटतो… अन् द्विअक्षरी ‘प्रेम’ हा शब्दही… आजची प्रेमदुनिया थोडी आगळीवेगळी,                थोडी विस्कटलेली,                थोडी बोधट          अन्                 थोडी प्रेमहिनही.. त्याची अवस्था गोगलगायीप्रमाणे झालीय…           गोगल गाय           नाकात दोन पाय           आवडलं तर बोल ‘हाय’           नाहीतर           आलं त्या वाट्यावरुन परत जाय… जगात प्रेमावर भाष्य करणारी अनेक मंडळी होती, आजही आहे आणि…

By

min read

प्रेमक-प्रेयसीच्या प्रेमबोली आणि 143 हा प्रेमांक

मला खूप खतरनाक वाटतो…

अन्

द्विअक्षरी ‘प्रेम’ हा शब्दही…

आजची प्रेमदुनिया

थोडी आगळीवेगळी,

               थोडी विस्कटलेली,

               थोडी बोधट

         अन्

                थोडी प्रेमहिनही..

त्याची अवस्था गोगलगायीप्रमाणे झालीय…

          गोगल गाय

          नाकात दोन पाय

          आवडलं तर बोल ‘हाय’

          नाहीतर

          आलं त्या वाट्यावरुन परत जाय…

जगात प्रेमावर भाष्य करणारी अनेक मंडळी होती, आजही आहे आणि पुढेही असतील…

तिकडे शेक्सपिअर, अस्तेन, करलोट, निकोलस यांनी धुमाकूळ घातलंय आणि इकडे     

          मीराच्या बोली,

          प्रेमाची खोली,

अन

          प्रेमडोली…!

हे सगळं मनाला हादरून टाकतय…

आइन्स्टाईनने तर प्रेमातही सापेक्षतेचा सिद्धांत मांडलंय…!

मागे दोन वर्षांखाली मराठी हस्य काव्यसंमेलनामध्ये प्रेमावर कविता सादर करण्यात आली…

तीच पारायण मी मराठी भाषण कौशल्याअंतर्गत माझ्या वर्गात प्रस्तुत केलेलं आठवतंय…

कवितेचे बोल-

        प्रेमात फार वेळा काय होत?

        प्रेम तिच्यावर करायचं

        घराभोवती फिरायचं(2)

        अन एके दिवशी

        तिच्याच लग्नात जेवायचं…

        अशी लग्न खूप जेवलो…

        अशी लग्न खूप जेवलो…

        कारण

        प्रत्येकीनं आग्रहाने निमंत्रण धाडली…

        निमंत्रयाबरोबर स्पेशल पत्रही पाठवलं…

        त्यात पुन्हा तीत

        लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन

        असं लग्न जमल्यावरही तिन्हे म्हणायचं

        मी फक्त

        प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेऊन

        ‘प्रेमा’च्या ढेकरा देत फिरायचं

        आणि

        अजून किती पत्रिका येतील,

        याच अंदाज घेत बसायचं…

        असे लग्न जेवता-जेवता

        दिवस असे सरत गेले

        अन् एके दिवशी तिच्या

        ढवाळ जेवणाचे आमंत्रण आले…

        आदी-मधी-कधी

        भेटलीच तर म्हणते ‘प्रिय करा'(2)

        आणि माझ्या बाळाचं

        बार्सही देखील जेवलं पाहीजे…

        प्रेमात फार वेळ असाच होतं

        प्रेम तिच्यावर करायचं

        घराभोवती फिरायचं

        अन् एके दिवशी

        तिच्या पोरानं मला ‘मामा’ म्हणायचं…!!

असो…

मला तर वाटतंय बुवा;

जे रंगहीन, रुपहीन, देहहीन असतं, ते प्रेम असतं…

ना त्याला कशाची भाषा,

ना त्याला कोणाची आशा,

ना कोणाकडून कशाचीही अपेक्षा…

रंगात-रंग रंगाविणारे…

सुरा-सुरात सूर लावणारे…

इतिहासात इतिहास लिहिणारे…

वर्त-भूत अन भाव्याचा काळ सांगणारे…

त्यागात प्रेमाचं प्रतिबिंब बघणारे…

कोलंबशी प्रेम-विश्व शोधणारे…

असे दोन निःस्वार्थी, निष्पन्न, निष्पाप हृदय म्हणजे ‘प्रेमा’चे दोन मुळाक्षरे..!!

प्रेमाला अंत नसतो…

बस

    वेळेनुसार त्याला लपवता,

    दाबून ठेवता येतंय…

काहीवेळेस प्रेमच नव्हतं असही बोलावं लागत…

प्रेमात हसता येतं, रागावता येत आणि रडुदेखील…

त्यात तुझे-माझे युद्ध देखील मोडतात…

काळानुसार त्याला ‘अबोल-अर्धांगवायू’ देखील होतो…

पण

जेथे प्रेमाला ‘सामंजस्वा’चा मुलामा असतो, तेथे सुरकतलेल्या प्रेमाची ओजस्वीता पाना-फुलासारखी फुलते…

बस,प्रेमाला फुलवणारी मन असावी लागतात…!

     मनाला-मन जोडणारे ह्रदय असावे लागतात…!

अन्

     हृदयाला-हृदय जोडणारे माणसं देखील…!

शेवटी,

मंद झुळूक यावी…

तुझी-माझी होडी, लांब वाहून जावी…

      आपण फक्त डोळ्यांनी बोलावे, जाई-जुईवाणी…

      हीच माझी प्रेमबोली आणि ‘राजयोगी’ प्रेमवाणी…!!

23/12/2018

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.