प्रवास

जीवन फार खट्याळ आहे. त्याचा नटखटपणा दुःखाच्या समुद्रावरून, सुखाच्या हिमालयावरून अन् क्षणिक वाळवंटी तर क्षणिक स्वर्गीय सहवास देतो. जीवनाच्या या अनंत चक्रातून बाहेर पडायला स्वप्नात जिद्द हवी आणि आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीमध्ये डोळ्यात डोळे विजयाच्या प्रतिमा बघण्याची हिम्मत हवी… तुमचा भूतकाळ तुम्हाला नीट श्वास घेऊ देत नसेल, तुम्हाला नीट जगू देत नसेल तर तुम्ही भाग्यवान…

By

min read

जीवन फार खट्याळ आहे. त्याचा नटखटपणा दुःखाच्या समुद्रावरून, सुखाच्या हिमालयावरून अन् क्षणिक वाळवंटी तर क्षणिक स्वर्गीय सहवास देतो.

जीवनाच्या या अनंत चक्रातून बाहेर पडायला स्वप्नात जिद्द हवी आणि आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीमध्ये डोळ्यात डोळे विजयाच्या प्रतिमा बघण्याची हिम्मत हवी…

तुमचा भूतकाळ तुम्हाला नीट श्वास घेऊ देत नसेल, तुम्हाला नीट जगू देत नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. ज्यांच्या भूतकाळामध्ये रक्तबंबाळाची निशाणी आहे, त्याच्या भविष्यामध्ये शौर्याची गौरवगाथा असते हे कदापि विसरू नये…

तथापि भूतकाळाचा बाऊ करता-करता वर्तमानाचा अपमान करणे योग्य नव्हे.

त्यामुळे आतां;

                जागं होवाच लागेल…

                इतिहास घडवावाच लागेल…

                प्रवास सुरु करावच लागेल…

प्रवास…

प्रत्येकाचा प्रवास आईच्या गर्भशायतच सुरू होत असतो. तो गर्भ विविधतेने नटलेल्या साम्राज्यात येण्यासाठी उत्सुक असतो, आतल्या-आत धडपड जोरात असतो. ‘गर्भ’ स्वर्गापरी असतो असं म्हणण्यात जराही अतिशयोक्ती होणार नाही.

अशा प्रवासाची चोफेरी सफर धन-दौलत, गरिबी-श्रीमंती, न्यायी-जुलमी, स्वार्थी-कपटी, मृगजळी वळणावरून होत असते.

पुढच्या प्रवासात मी-तू-ते-तो-ती असे अनेक जण जन्माला येतात

जीवनाच्या अथांग प्रवासात अनेक लोक सोबतीला येतात.त्यामधले काही लोक वेगळ्या दिशेला जातील.त्यांच्या मस्तकामध्ये परिस्थितीने निर्माण केलेल्या विचारांवर त्यांचा प्रवास चालू राहील. ‘सोबतीच्या’ प्रतिज्ञेला घट्ट मिठी मारून बसण्यात काही अर्थ नाहीये.वेळ आल्यावर प्रतिज्ञेला राम-राम ठोकून क्षितिजकडे स्वारी घ्यावी लागते.

मानवी स्वभाव आणि आदर्श विचारधारा कृतार्थापासून रोखू शकत नाही. त्यामुळेच स्वतःची पाठ कणखर ठेवून उन्हा-तानात, थंडी-पावसात प्रवास करण्याची सवय असावी लागते.

निसर्गाने निर्माण केलेल्या नियतीला नमस्कार करत आत्मशोधी अमृतासाठी खडतर काटेरी वळणावर चालावच लागतं.

हा ‘प्रवास’ कदाचित आयुष्याला कलाटणी देऊन विजयाची तोरण बांधण्यासाठी अतुरावस्थेत घड्याळाचे काटे मोजतोय.

      “होऊ आता आवासी…

       चकरा मारुया कैलाशी…

       आळलेल्या पाषाणातून तेल काढणारा,

       म्या प्रवाशीमंत सम्राटी!”

सोम; 07/01/2019

शनि; 27/01/2019

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.