प्रश्न

एकदा तिने मला प्रश्न विचारलं… तू दुसऱ्यासारखं हसत-खेळत दिसत नाही रे, या मागे काही रहस्य आहे का? सगळ्यात अगोदर माझ्याबद्दल कमीत-कमी कोणीतरी विचार करतंय, म्हणून माझ्या मनात चांदण्या चमकल्या…!! तिच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर किती आवश्यक होतं, हे तीच जाणे… पण हा सवाल माझ्यासाठी युधिष्ठिराला विचारलेल्या यक्ष-प्रश्नापैकी एक होता. आरे मी पण तुझ्यासारखं मानवी मूर्त-अमूर्त सजीव…

By

min read

एकदा तिने मला प्रश्न विचारलं…

तू दुसऱ्यासारखं हसत-खेळत दिसत नाही रे, या मागे काही रहस्य आहे का?

सगळ्यात अगोदर माझ्याबद्दल कमीत-कमी कोणीतरी विचार करतंय, म्हणून माझ्या मनात चांदण्या चमकल्या…!!

तिच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर किती आवश्यक होतं, हे तीच जाणे… पण हा सवाल माझ्यासाठी युधिष्ठिराला विचारलेल्या यक्ष-प्रश्नापैकी एक होता.

आरे मी पण तुझ्यासारखं मानवी मूर्त-अमूर्त सजीव प्राणी आहे. कोणाला पांढराशुभ्र चंद्र दिसतो तर कोणाला त्या स्वेती चांद्रवरच काळा धब्बा!

काळानुसार निसर्ग बदलतो आणि निसर्गानुसार माणूस… निसर्ग, नियतीने निर्माण केलेल्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मानवाला सूचित करतो… त्यानुसार तो दिशा दाखवतो…

परंतु अश्याच वेळी, मानव चक्रातून बाहेर पडण्याऐवजी चक्रात आपल्या अस्मितेचा घर बांधतो. आणि याच घरामध्ये तो बेडकसारखं गोल चकरा मारतो…

हेच त्याच अश्व,

हेच त्याच विश्व…

तुझ्यात अन् माझ्यात काही भेद आहेत…

आचार व विचार हे आपल्या मध्यस्थी आहेत…

तू त्या स्वर्गरुपी कल्पत्या विश्वाची महाराणी आहेस आणि मी  निसर्गाच्या बोलावर डोलणारा सर्वसामान्य अश्वमेघी नंदीबैल!

तुम्हाला आनंद लुटता येतो, निसर्गाच्या देहबोलचा…

आम्ही पुरोगामी विचाराचे परग्रही प्राणी.

आम्हाला आनंद भेटतो;

   दुसऱ्याच्या दुःखात सामील होण्यात,

   त्या दुःखाचा भागीदार बनण्यात,

   अन्

   दुःख पचवण्यात…

स्वतः काळोखात जीवन जगताना एक प्रकाशी किरण बनून जगात पसरलेल्या अंधाराचा नायनाट करण्यात आनंद भेटतो…

मला दुसऱ्याच जीवन कला, साहित्य अन् संगीतात जगण्यात मजा येते… मजा येते मला मानवाच्या भावना-संवेदनामध्ये जगण्यात…

मुळीच, माझी वाट कुसुमाग्री आहे… फ्रॉस्टीच दिशासुचक काव्य माझ्या नसा-नसात भिनलय…

‘या मानवी सुख-दुःखाची, आशा-आकांक्षेची वेणी घालावी’ असं माझ्यातलं माणूसपण मला सांगत होत…

त्याचे बोल माझ्या हृदयात कोरले गेलेत…

म्हणून;

      मला यशप्राप्ती नको, समाधानी जीवन हवंय…

      मला चमकते हिरे-मोती नको, तुझ्या डोळ्यातलं तेजस्वीपणा हवंय…

मला तुझा ‘प्रश्न’ हवंय अन् तुझ्या प्रश्नार्थी माझं ‘राजयोगी’ प्रातिउत्तर…!!

22 March 2019

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.