Category: Marathi Blog

  • प्रवास

    जीवन फार खट्याळ आहे. त्याचा नटखटपणा दुःखाच्या समुद्रावरून, सुखाच्या हिमालयावरून अन् क्षणिक वाळवंटी तर क्षणिक स्वर्गीय सहवास देतो.

    जीवनाच्या या अनंत चक्रातून बाहेर पडायला स्वप्नात जिद्द हवी आणि आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीमध्ये डोळ्यात डोळे विजयाच्या प्रतिमा बघण्याची हिम्मत हवी…

    तुमचा भूतकाळ तुम्हाला नीट श्वास घेऊ देत नसेल, तुम्हाला नीट जगू देत नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. ज्यांच्या भूतकाळामध्ये रक्तबंबाळाची निशाणी आहे, त्याच्या भविष्यामध्ये शौर्याची गौरवगाथा असते हे कदापि विसरू नये…

    तथापि भूतकाळाचा बाऊ करता-करता वर्तमानाचा अपमान करणे योग्य नव्हे.

    त्यामुळे आतां;

                     जागं होवाच लागेल…

                     इतिहास घडवावाच लागेल…

                     प्रवास सुरु करावच लागेल…

    प्रवास…

    प्रत्येकाचा प्रवास आईच्या गर्भशायतच सुरू होत असतो. तो गर्भ विविधतेने नटलेल्या साम्राज्यात येण्यासाठी उत्सुक असतो, आतल्या-आत धडपड जोरात असतो. ‘गर्भ’ स्वर्गापरी असतो असं म्हणण्यात जराही अतिशयोक्ती होणार नाही.

    अशा प्रवासाची चोफेरी सफर धन-दौलत, गरिबी-श्रीमंती, न्यायी-जुलमी, स्वार्थी-कपटी, मृगजळी वळणावरून होत असते.

    पुढच्या प्रवासात मी-तू-ते-तो-ती असे अनेक जण जन्माला येतात.

    जीवनाच्या अथांग प्रवासात अनेक लोक सोबतीला येतात. त्यामधले काही लोक वेगळ्या दिशेला जातील.त्यांच्या मस्तकामध्ये परिस्थितीने निर्माण केलेल्या विचारांवर त्यांचा प्रवास चालू राहील. ‘सोबतीच्या’ प्रतिज्ञेला घट्ट मिठी मारून बसण्यात काही अर्थ नाहीये. वेळ आल्यावर प्रतिज्ञेला राम-राम ठोकून क्षितिजकडे स्वारी घ्यावी लागते.

    मानवी स्वभाव आणि आदर्श विचारधारा कृतार्थापासून रोखू शकत नाही. त्यामुळेच स्वतःची पाठ कणखर ठेवून उन्हा-तानात, थंडी-पावसात प्रवास करण्याची सवय असावी लागते.

    निसर्गाने निर्माण केलेल्या नियतीला नमस्कार करत आत्मशोधी अमृतासाठी खडतर काटेरी वळणावर चालावच लागतं.

    हा ‘प्रवास’ कदाचित आयुष्याला कलाटणी देऊन विजयाची तोरण बांधण्यासाठी अतुरावस्थेत घड्याळाचे काटे मोजतोय.

           “होऊ आता आवासी…

            चकरा मारुया कैलाशी…

            आळलेल्या पाषाणातून तेल काढणारा,

                      म्या प्रवाशीमंत सम्राटी…!”

    सोम; 07/01/2019

  • सोशल मीडिया सोसतोय का?

    मानवाच्या उत्क्रांतीबरोबर प्रसार माध्यमाचा वापर आणि विकास होत गेला. प्राचीन काळात माणूस आपला संदेश दूताद्वारे व कबुतराद्वारे पाठवत असे. सोळाव्या शतकात पाश्चात्य देशांनी विज्ञानात अफाट झपाटी मारायला सुरुवात केली. मग पुढच्या काळात टेलिग्रामचा शोध लागला, नंतर टेलिफोन आणि हल्ली टीव्ही, संगणक, मोबाईल, इंटरनेट यांच्या शोधामुळे सर्व विश्व एक मुठीत असल्याचा आज आपल्याला भास होतो. सोशल मीडियामुळे आपण देश-प्रदेशाच्या पलीकडे जाऊन लाखो किमी. अंतरावर देखील संभाषण साधू शकतो, आपल्याला हव्या असलेल्या बातम्या काही सेकंदात प्राप्त करू शकतो. एवढचं नव्हे तर आपण अमेरिकेत शिकवत असलेल्या गोष्टी घरबसल्या अभ्यासू शकतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही वेळातच ‘रक्त पुरवठा’ होतो. चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या  ‘करोना’ विषाणूबद्दल देशाच्या विविध कोपऱ्यात माहिती पोहचली. या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाने मानवाला दिलेली एक सुवर्ण-शिदोरी होय.

    आपले वयक्तिक विचार लोकांसमोर मांडण्यासाठी हल्ली लोक फेसबुकचा मोठया प्रमाणावर वापर करत आहेत. कोणी लोकांना चांगली माहिती देतंय तर कोणी माहितीच्या आधारे लोकांमध्ये भांडण पेटवतय. मिर्झापुर या मालिकेत दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या बंदुकांचा व्यापार वाढवायचा असेल तर लोकांना त्याची गरज भासेल अशी अस्थिरता निर्माण करणं गरजेचं ठरतं. त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजमध्ये राजकारण चालू ठेवायचं असेल तर ‘भक्त’ प्रजाती निर्माण कराव्या लागतील हे सगळेच नेते समजतात. यामध्ये सोशल मीडिया हे त्या लोकांसाठी सगळ्यात चांगलं माध्यम आहे. विडिओ, फोटो आणि लेखाच्या मदतीने लोकांपर्यंत जाती-धर्माचे डोस पोहचले की गांडुळाप्रमाणे लोकं सळसळ करायला लागतात. बौद्धिक पागलपंतीच्या यादीत ‘व्हाट्सएप युनिव्हर्सिटी’ने देशात पहिला क्रमांक प्राप्त केल्याचं अनेक समीक्षकांचे मत आहेत.

    सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतामध्ये आयटी इंडस्ट्री भराट्याने वाढत आहे. वैश्विक स्तरावरती अनेक देशामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची स्पर्धा चालू झालीय. भारतामध्ये जागतिक स्पर्धेबद्दल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या क्षेत्राचे फायदे आणि तोटे आहेतच परंतु जागतिक पातळीवर पुढच्या २५-३० वर्षांत अर्थवव्यवस्थेला टिकवायचा असेल तर भारतातल्या शिक्षित बेरोजगारापैकी ज्यांना सोशल मीडिया हाताळता येते त्यांना या क्षेत्रामध्ये आता गुंतवण अत्यंत गरजेचं आहे. नाण्याला हेड आणि टेल या दोन बाजू असतात. पैंजमध्ये हेड लावल्यावर आपण जिंकू की नाही हे टॉस खाली पडल्यांनातरच समजेल. भविष्यात आपण सगळ्यांच्या पुढे जरी जाऊ शकलो नाही तरी कमीतकमी आपण आपलं स्थान जागतिक पातळीवर नोंदवुयात.

    प्रसार माध्यमांना लोकतंत्राचा चौथा मूलभूत पाया मानला जातो. सरकार आणि जनता यांच्यामधील संभाषण हे प्रसार माध्यमाद्वारे आणि जनतेने निवडलेल्या प्रतिनिधीद्वारे होत असतो. सरकारी कामकाजामध्ये चेक्स अँड बॅलन्स(समतोल) असणं हे लोकतंत्रासाठी महत्वाचं ठरत तर त्यासाठी ‘स्वतंत्र’ सोशल मीडिया हे अंगभूत घटक आहे. २०१८ मध्ये रिपोर्टर्स सॅन्स फ्रँटीअर्स या पॅरिसमधील माहितीच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या संस्थेने १८० देशाचा अभ्यास केला ज्यामध्ये जागतिक प्रसार माध्यमाच्या स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा १३८ वा क्रमांक होता. या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केल्यास भारताला पाकिस्तानाइतकेच म्हणजे ४३.२४ गुण होते.

    भारताला समाज प्रबोधनाची चळवळ लाभली. त्यात पुरोगामी विचारांची ज्योत घेऊन जाणारे लोक आजही समाजात वावरत आहेत(आणि वावरतदेखील होते). विविध स्तरावरचे विविध लोकं आपापल्या परीने समाजबांधणीमध्ये कार्यरत असतात. एकीकडे कुलबर्गी, गौरी लंकेश आणि याच पंगतीमध्ये बसणाऱ्या इतर पत्रकारांची हत्त्या केली जाते… दुसरीकडे निरपेक्ष न्यायलायचा संविधानी तराजू गंजून गेलाय. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्टने(सीपीजे) याने सूक्ष्म चौकशी करून जगात १९९२ पासून मारल्या गेलेल्या १३५० पत्रकारापैकी ५० भारतीय पत्रकार आहेत. अनेक पत्रकार ब्लॉगच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहचण्याचा काम करत होते. यापैकी ३५ जण हे ‘बातमी किंवा भाष्य केल्याने आगर केल्यापासून रोखण्यासाठी’ मारले गेले. सीपीजेच्या अहवालानुसार जातीयवादी राजकारण व सामाजिक ध्रुवीकरणामुळे भारतातील परिस्थिती अधिक बनत असल्याचा संकेत देतो.

    सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाचे खाते उघडताना त्या माध्यमाच्या टर्म्स अँड कंडिशन(अटी आणि गोपियनियता) न वाचता खाते उघडतो. वापरकर्त्याने दिलेले ई-मेल, पासवर्ड, त्याच्या आवडी-निवडी, आचार-विचार यांचा वापर त्या विशिष्ट व्यक्तीला हाताळण्यासाठी वापरतात तर दुसरीकडे हीच गोष्ट सायबर गुन्हेगारीला प्रोत्साहित करते. तिसरे विश्वयुद्ध हे सोशल मीडियाने साठवून ठेवलेल्या माहितीमुळे होऊ शकतो असे विविध समीक्षकांचे मत आहे. 

    भारतामध्ये फक्त २०१५ साली ११,५९२ सायबर गुन्ह्याची नोंदणी झाली. यामध्ये विशेषतः १५ ते २९ वयोगटातील युवापिढी आहारी गेलीय. एडवर्ड स्नोवडेन या अमेरिकन पत्रकाराच्या जीवनावर २०१६ साली हॉलिवूडमध्ये चित्रपट निघाला. त्या चित्रपटामध्ये अमेरिका सोशल मीडियाच्या जोरावर कशाप्रकारे जगावर स्वतःच वर्चस्व गाजवतो वा तेथील नागरिकांना स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षा का हवीय याचं ज्वलंत चित्रण केलंय.

    सौदी अरेबियाच्या एक कंपनीने अनेक देशांना एक व्हाट्सएप स्पायवेर(व्हायरस) विकला, ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल वर पूर्णपणे ताबा मिळवू शकतो. जर मला दिल्लीमध्ये बसून भारताच्या कोणत्याही कानोकोपऱ्यात एखाद्या व्हाट्सएप वापरकर्त्याच्या मोबाईल मध्ये जे चालू आहे वा त्याच्या मोबाईल मध्ये कायकाय माहिती आहे हे बघणं, कोणाला कॉल करणं, वाटेल त्या वेळी फोटो-व्हीडीओ-ऑडिओ रेकॉर्डिंग करणं इ. गोष्टी शक्य झाल्यात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात याचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यावेळी अनेक लोकांवरती नियंत्रण ठेवण्यात आले, असे सौदी अरेबियाच्या कंपनीने अमेरिकेत भरलेल्या एका खटल्यात सांगितले. मग लोकांनी व्हाट्सएप वापरावे की नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

    मीडियाचे चांगले आणि वाईट परिणाम आहेतच. आपण घोड्याला पाणी पिण्यासाठी घेऊन जाऊ शकतोत परंतु पाणी प्यायचं की नाही हे त्यालाच ठरवावं लागतं. अश्याच प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान लोकांना मीडिया देऊ शकतो पण त्याचा वापर कशाप्रकारे करायचं हे वापरकर्त्यालाच ठरवावं लागेल. 

    वाढती जनसंख्या, प्रदूषण, महागाई, भांडवलशाही, चंगळवादामुळे माणूस दिवशें दिवस एकटा पडत चालला आहे. फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम, टिकटॉक, ट्वीटर अश्या अनेक ठिकाणी ‘सर्च अल्गोरिदम’चा वापर करुन व्यक्तीच्या आवडी-निवडीनुसार पोस्ट दाखवल्या जातात. याच्या परिणामस्वरूप तरुण आभासी दुनियेत फसतात. आई.एस.आई.एस. सारख्या दहशतवादी संगठनानी शेकडो तरुणांचे ब्रेनवॉश केलेत. हे ‘आधुनिक गुलाम’ उद्या एखादे मनोरुग्ण बनून वर्तमानपत्रासाठी ‘आत्महत्येच्या’ हेडलाईल बनतात. पिसिंग सारख्या पद्धतीचा वापर करून अनेक हॅकर सायबर गुन्ह्याच्या यादीत आपली नोंदणी करतात. आज दारुप्रमाणे लोक मोबाईल-मीडियाच्या आहारी गेलेत. यामध्ये फक्त वापरकर्त्याचाच दोष नाहीये. मुळात हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यामधेच दोष आहेत. त्यांनी जाणूनबुजून या तंत्रज्ञानामध्ये थोडी पोकळी ठेवलेली आहे आणि प्रत्येक वापरकर्ता तो आपल्यापरीने ती पोकळ भरून काढण्याचा प्रयत्न करतो. उदा. युसी ब्राउझर वर अनावश्यक गोष्टींच्या जाहिरातीचा बाजार, एका टॅब वर फेसबुक चालू असेल तर ते इतर टॅब वरच्या माहितीला गोळा करू शकने, युट्युब वर आपण सर्च केलेल्या गोष्टीचं परत परत येणं, आपण इन्स्टाग्रामवर आपण पाठवलेले मॅसेज डिलिट न करता नाहीसे करणे वा टेलिग्रामवर ऑफिशिअल कंट्रोल न करता येन. विशेष म्हणजे वर्तमानात सोशल मीडियावर माहितीचा गाभा कमी आणि जाहिराती इतक्या वाढवल्यात की वापरकर्त्याना पागलखाण्यात भरती करावे लागेल. (पण पब्जी खेळाडू आणि टिकटोक किंग-क्वीनपेक्षा त्यांची संख्या कमीच आहे!)

    या सर्व गोष्टीचा विचार करता ‘सोशल मीडिया सोसतोय का?’ हा प्रश्न एकविसाव्या शतकाच्या युधिष्ठिराला विचारलेल्या यक्षप्रश्नपैकी एक असेल व त्याचे उत्तर आपापल्या परीने रेने देसकार्ट या पश्चिमात्य विचारवंताच्या भाषेत ‘आय थिंक देअरफॉर ऍम’ (मला वाटतंय म्हणून मी तसा) होय.

  • वयक्तिक सत्याग्रह


    नमस्कार, 

               मी राजेश सुंदरराव राठोड,पुण्यात शिक्षण घेणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी, महाराष्ट्राचा रहिवासी आणि भारताचा नागरिक! मागच्या दोन-तीन महिन्यात एक वाक्य खूप गाजलं. “आपण आपल्या तोंडावरती मास्क स्वतःच्या सरंक्षणासाठी लावत नाहीये तर स्वतःच तोंड पृथ्वीला दाखवायची लायकीसुद्धा राहिली नाही,म्हणून आपण मास्क लावतोय.” सुरुवातीला ‘निसर्गाने’ आपली लायकी काढली म्हणून थोडं वाईट वाटलं. पण आपण आपल्या स्वतःच आत्मपरीक्षण केलं तर जाणवेल की आपण निसर्गाचा ऱ्यास खूप मोठ्या प्रमाणावर केलंय. निसर्गामध्ये विविध गोष्टीचा समतोल(बॅलन्स) नसल्यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागतंय. काही ठिकाणी ढगफुटी होतेय तर काही ठिकाणी अचानक पूर येतोय. मग अशा अचानक येणाऱ्या संकटांना एक सामान्य माणूस म्हणून कशाप्रकारे पुढे जायचं? किंवा असे संकट येऊ नये वा त्या संकटांचं प्रमाण आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल का? आपण पूर्णपणे निसर्गाला मात करू शकणार नाहीत पण ‘आपण आपल्या पातळीवर वर काय-काय करू शकतो?’ या अनुषंगाने मी, माझे मित्र, सामान्य माणसापासून ते विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर; आम्ही एकत्रितपणे वयक्तिक सत्याग्रहाची एक चळवळ हाती घेतली आहे, ज्यामध्ये आम्ही स्वतः प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करतोय आणि आपल्या तांड्यातल्या, सोसायटीतल्या, गावातल्या लोकांना, आपल्या मित्रांना, कुटूंबातील लहान मुलांना, नातेवाईकांना कॉल करून या वयक्तिक सत्याग्रहामध्ये सामील करत आहोत. 

                तुमच्यापैकी खूप लोकांना वाटेल की यामध्ये नवीन असं काय आहे? मी तर फटाके वाजवत नाही! मी या उपक्रमाबद्दल मित्रांसोबत बोलत असताना असं समजलं की त्यांच्यापैकी काही मित्र मागच्या पाच-सहा वर्षांपासून फटाके वाजवत नाही. मला स्वतःच अभिमान वाटतो की मागच्या नऊ वर्षांपासून फटाके वाजवत नाही. आता ही गोष्ट मी स्वतःच्या फुशारकीसाठी तुम्हांला सांगत नाहीये. असा मी एकटाच आहे अशी पण गोष्ट नाहीये तर असे अनेक लोक आहेत. 

               लक्षात घ्या, १०००-१२०० लोकांनी फटाके वाजवले नाही तर याचं परिणाम (इफेक्ट) आपल्याला जाणवणार नाही परंतु हीच गोष्ट १५-२० लाखावर गेला तर… यापासून आपल्याला फायदा काय होईल की नाही हे मी सांगू शकणार नाही पण यापासून तोटा काही होणार नाही, हे मी १०० % सांगू शकतो.

                आपल्या गावामध्ये अनेकदा रॉकेट-बॉम्ब आपल्या कडबा-सरमाड, भुसकट किंवा ऊसात देखील जाऊन पडतो. मागच्या काही वर्षात कापसाचे घर पूर्णपणे जळून जाण्याचं प्रमाण वाढलंय. वर्षभर केलेली मेहनत काही मिनिटात नष्ट होते. एवढच नाही तर फटाक्याच्या मोठ्या आवाजामुळे घरात जन्माला आलेली लहान मुलं आणि वयोवृद्ध आजी-आजोबा यांचा जीव गेला, अशा अनेक बातम्या आपण ऐकल्यात. म्हणजे फटाके आपण स्वतःच्या पैशाने खरेदी करायचं, स्वतःच आर्थिक नुकसान करायचं, आपलं स्वतःच आरोग्य खराब करून घ्यायचं, आनंदाच्या वेळी आपण आपल्याच चुकीमुळे स्वतः दुःख ओढवून घ्यायचं हे बरोबर नाहीये. आपलं कुठेतरी चुकतंय… मग 🙄 आपण आपल्या स्तरावर आपल्यासाठीच काही करू शकतो का? हो नक्कीच करू शकतो….💭 

                  या संपूर्ण चळवळीमध्ये आम्ही कोणालाही फोर्स करत नाही आणि तुम्हीदेखील फोर्स करू नका. ते आपले कुटुंबातील व्यक्ती आहेत, मित्र, नातेवाईक आहेत. आपण त्यांना समजावून सांगु शकतोत, फोर्स नाही करू शकणार.

    🌀ज्यांना वाटतंय की आपण इथून पुढे फटाके न वाजवता देखील दिवाळी साजरा करू शकतो, ते खरोखर कौतुकाचे पात्र आहेत. 

    🌀ज्यांना फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटतच नाही, त्यांनी मागच्या वर्षी जर १०००-१२०० ₹ फटाके घेतले असतील तर यावर्षी कमीत कमी २५% ने फटाके कमी घ्या… पुढच्या वर्षी अजून २५-३०% ने कमी फटाके खरेदी करूया. 

    👀 आपण अजून एक काम करू शकतो…

    १०००-१२००₹ च्या फटाक्याऐवजी आपल्याला आवश्यक गोष्टी/वस्तू खरेदी करूयात. उदा,आपल्या घरातील मुलांना जर वाचनाची आवड असेल, तर त्याला चांगल्या कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह वा आत्मचरित्र आणून द्या किंवा मुलांना जर चित्रकलेची आवड असेल तर त्याला ब्रश, कलर, कॅनव्हास घेऊन द्या, जेणेकरून ते भविष्यात या गोष्टींचा वापर करू शकतील.

    ♻️ज्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये फटाके वाजवायचे आहेत, त्यांनी ग्रीन(जे कमी प्रदूषण करतात) फटाके वाजवा. 

              मागच्या १०-१२ दिवसात आम्ही सर्व सामान्य लोकांनी आप-आपल्या मित्रांना कॉल करून सांगितलं आहे आणि आपल्यातील अनेक लोक, आपली चळवळ किती लोकांपर्यंत पोहोचली याबद्दल रेकॉर्ड ठेवत आहोत. त्यानुसार आज १४ ऑक्टोबर रोजी आपल्या या सत्याग्रहाला जवळजवळ २३,४०० लोक सहमत झालीत. त्यांना हा प्लॅन खूप आवडलाय. (हा आकडा अजून वाढवू शकतो) एवढच नव्हे तर आपण महाराष्ट्र सोडता गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आपला वयक्तिक सत्याग्रह करत आहोत. आपल्या आरोग्यासाठी, स्वतःच्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी आजच आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावं लागेल. प्रदूषणाचे(फटाके वाजवल्यामुळे) दुष्परिणाम संपुर्ण निसर्गावर तर होतचं आहे पण या सर्वामध्ये मानवजातीला(जो फटके वाजवेल आणि जो वाजवणार नाही त्यांनादेखील) आज ना उद्या खूप वाईट अवस्था होणार आहे. आज आपल्याला आपल्या चुका सुधारण्यासाठी वेळ आहे; आपण स्वतः पुढाकार घेऊन आपल्या वयक्तिक पातळीवर स्वतःची जीवनशैली बदलायला हवं. थोर पुरुष जन्माला यावं तर तो शेजारच्या घरात जन्माला यावं अशी आपली समजूत आहे. ही समजूत बदलण्याची संधी आपल्याला आहे. यासाठी थोर पुरुष घरात जन्माला यावं अस आवश्यक नाहीये तर आपण स्वतःच चांगल्या आचाराने आणि विचाराने थोर बनू शकतो. 

    आज आपण झाडं लावूया, उद्या त्याची फळ मिळतील!

    तुम्हांला आमच्याकडून ऍडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔 🪔 

    तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला 📱9096119950 या नं. वर व्हाट्सएपद्वारे किंवा 📧 [email protected] यावर मेल द्वारे कळवा.

    तुम्हांला आमचा पुढाकार/उपक्रम आवडला असेल तर तुम्ही स्वतः स्वतःच्या पातळीवर 💯 राबवा आणि हा मेसेज आपल्या मित्रांना, कुटूंबियांना आणि नातेवाईकांना फॉरवर्ड करा..

    17 Oct 2020

  • विचारमग्न

    आयुष्य कसे क्षणार्धात बदलुन जाईल हे कोणत्याच आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा भाष्यकार पण कधीच सांगू शकणार नाही…याला कारण ही तसेच असते… जलद गतीने धावणाऱ्या जगाला शांतता समुद्रकिनारी किंवा गिर्यारोहण करताना हमखास प्राप्त होयची परंतु आता वेळच अशी आलीय…जग पूर्णपणे शांत झालेय पण मनाचे काय..? त्यात मात्र खूप चलबिचल सुरू आहे…विचार कशाचा करायचा याचा पण मनात विचार घोळत नाहीये खूप गोंधळ सुरू आहे, पूर्णपणे त्रेथातिरपट उडालीय…जे सुरू आहे ते योग्य की अयोग्य हे पण कळायला मार्ग नाही… सद्यस्थितीत आहे ते योग्यच आहे हेच समजायचं आणि पुढे चालत राहायचं… शेवटी एकच गोष्ट ध्यानात धरायची… जे काही होतेय ते चांगल्यासाठीच बाकी काही नाही…

    🙃

    सुमित चौधरी

    27 May 2020

  • शिवाजी कोण होता?

    शिवाजी कोण होता?

    “शिवाजी कोण होता?” गोविंद पानसरे यांच्या द्वारे लिखित पुस्तकावर लघुनिबंध/सारांश लेखन…

    “खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या

     उडवीन राई राई एवढ्या…”

    कवीने एका मावळ्यांचे उद्गार धान्यांनी भरलेल्या शेतातून जाताना घोडेस्वारासोबत बंड करून उठतो, असे वर्णन केले आहे आणि तो शेतातून जाणारा घोडेस्वार दुसरा कोणी नसून खुद्द राजे आहेत(त्याने महाराजांना पहिलच नव्हतं!). ही सामर्थता ज्याच्या मावळ्यात असू शकते, त्यांचा राजा कसा असू शकेल? पण मध्यंतरी त्यांचा इतिहासाचा विपर्यास करण्यात आला. महाराजाची यशोगाथा स्वतःच्या स्वार्थापायी मराठी मातीपासून लपवून ठेवण्यात आली होती. पुढे महात्मा फुल्यांनी रायगडावर महाराजांची मूर्ती शोधून काढली आणि त्याच्यानंतर त्यांच्या पोवाड्याद्वारे राजे महाराष्ट्राला माहीत झाले. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेलं एक थोर रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. ज्यांच्या कर्तुत्वाचे दाखले जगभर दिले जातात त्या शिवाजी महाराजांना काही लोकं मात्र केवळ राजकारणासाठी वापरत होते (आजही वापरत आहेत) आणि  समाजात सत्य सामोरे येऊ दिलंच नाही. मोठ्या प्रमाणावर सत्य वाटेल अश्या असत्य गोष्टीची मांडणी साहित्याच्या माध्यमातून करण्यात आली. त्याला प्रतिउत्तर म्हणून १९८८ च्या काळात गोविंद पानसरेंनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाची पुराव्यासह मांडणी केली. ती तत्कालीन काळाची गरज होती आणि आजही आहे. याची शाश्वती आज आपण लिहत असलेल्या सारांशातून होतेय कारण आजही महाराज जनसामान्यांपर्यंत पोहोचले नाहीत. प्रस्तुत पुस्तकाचे विविध भाषांतर आणि त्याच्या खपलेल्या प्रती ह्या विषयाची गहनता स्पष्ट करतात.

    आजच्या या एकविसाव्या शतकात देखील जाती, धर्म, लिंग, वंशावरून भेदभाव होतो.  त्या काळात महाराजसोबतही भेदभाव झाला. पहिल्यांदा तर त्यांना शूद्र जातीचे म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यापासून ब्राह्मणांनी विरोध केला. पुढे पहिल्या राज्याभिषेकामध्ये गागाभट्टाने काही चुका केल्या म्हणून निश्चलपुरी गोसावीने पुन्हा राज्याभिषेक केला. एका राजास दोनदा राज्याभिषेकाला भाग पाडून देवाला आणि ब्राह्मण पुरोहितला संतुष्ट करूनही या राज्याभिषेकानंतर राजे फक्त सहा वर्षे जगले. त्याकाळी शिवाजी महाराजांना शुद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यांत महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. चातुर्वणर्य रचनेचा, वर्णवर्चस्वाचा त्रास शिवाजीलासुध्दा झाला. तो धर्म मानीत असल्याने त्याने मार्ग काढला. राज्याभिषेक करवून घ्यावा लागला धर्माची मान्यता घ्यावी लागली. एवढेच नाही तर स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे ९६ कुलीचे मराठे सरदारही शिवाजीचा ‘राजा’ म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. जावळीच्या मोऱ्याची गोष्ट सर्वानाच माहीत आहे! या सर्व बाबीचा अर्थ म्हणजे सर्वच ब्राह्मण वा ९६ कुळी मराठे त्याचा विरोधात करत होते असे नव्हे. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. मोरोपंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते. ते एक मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होते. शिवाजीची आग्र्याहुन सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासात नोंद केलेली आहे. याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव मोहिते, येसाजी कंक, शिवा काशीद अशा हजारो मराठी मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीस प्राण त्यागले.

    शिवाजी हिन्दू होता. शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभुमीही महाराष्ट्रच होती. यामुळे हिंदूंना शिवाजीसंबंधी अभिमान वाटतो. पण प्रत्येक गोष्टीला हिंदू-हिंदू जोडून शिवाजीराजांना फक्त हिंदुसाठीच मर्यादित ठेवणे चूक आहे. रयतेच्या स्वराज्य निर्मितीमध्ये सर्व जातीचे-धर्माचे लोक होते. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हे आपण आज उगाच म्हणत नाही. त्यामागे जिवा महाला, शिवा न्ह्यावी अशा अनेक मावळ्यांच्या प्राणाची आहुती आहे. महाराजांचा किल्लेदार हा महार, हेरप्रमुख बहिर्जी हा रामोशी, आरमार सरदार हा मायनाक भंडारी होता तर आरमार प्रमुख दौलतखान, तोफखाना प्रमुख इब्राहिम होता. राजाने आपल्या जनतेला आणि स्वराज्य हिताला प्रथम प्राधान्य दिलं म्हणून जात-धर्मापुढेही जाऊन अंतरजातियच नव्हे तर अंतरधर्मीय विवाहास मान्यता दिली. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता पण त्याची धर्मश्रध्दा आंधळी नव्हती. शिवाजीने मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले नाही तर त्यांच्याशी सोयरसंबंध जोडले. राज्य कारभारामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी जमीन मोजली, वतने देण्यास विरोध केला आणि वसूल ठरवून दिला. एवढेच नाही तर दुष्काळ पडल्यास नवीन पिकास बीज दिले व वसुलीही माफ केली. ‘जय भवानी,जय शिवाजी’ म्हणून शिवाजी महाराज समजत नाही; अश्या कणखर भाषेत ललेखकाने वास्तवाची जाणीव करून दिली आहे. ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणून जयंती साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी लोकं वर्गणी गोळा करतात पण या वर्गणीची पारदर्शकता कितपत असते वा असायला पाहिजे, यावर कोणाचाही नियंत्रण नसतं. ज्या राजाच्या काळात कधी भ्रष्टाचाराला वाव मिळाला नाही त्या राजाच्या नावावर भ्रष्टाचार होत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे.

    लेखकाने वाचकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. उदा. क्षत्रिय कुलवंतस? कुलवाडी भूषण? भवानीची तलवार कुठून आली? इ. त्यांनी फक्त प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर त्यांचं निवारण देखील केलंय. याचबरोबर त्यांनी ‘शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता, तो हिंदू धर्मरक्षक होता, गोब्राह्मण प्रतिपालक होता, शिवाजी धर्मासाठी लढला म्हणूनच तो यशस्वी झाला वा भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणकरताच दिली, शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी झाला नसता’ इ.लेखकाने बाबीना मोडून काढल्यात. जर राजे हे हिंदू धर्मरक्षक होते म्हणून ते यशस्वी झाले असे गृहीत धरले तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाही? विशेष म्हणजे इतर दोन्ही तर निर्विवादपणे ‘उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू’ होते. महाराजांच्या क्षत्रियत्वासंबंधी काहींना तरी शंका होती. स्वराज्य हे हिंदू राज्य व्हावे अशी ‘श्रींची’ इच्छा असे म्हणावे तर मग ‘श्रींना’ राणा प्रतापच्या अन् पृथ्वीराज चौहानाच्या प्रदेशातही ‘हिंदू राष्ट्र व्हावे’ असे का वाटले नाही. पानसरेंनी प्रस्तुत पुस्तकामध्ये संदर्भासह युक्तिवाद मांडलाय, हे या लेखनाचं वेगळेपण.

    आणखी एक खासियत म्हणजे या पुस्तकामध्ये लिहलेल्या अनेक गोष्टींचा प्रत्यय आजही आपल्याला समाजामध्ये अनुभवायला मिळतय. उदा.सरंजामशाहीच्या काळात, पुस्तक लिहिलेल्या काळात आणि आज पुस्तक लिहून तीन दशक उलटून गेलीत तरीही लेखकाने मांडलेल्या स्त्रीप्रश्नाचं समाधान अजून अनुत्तरित आहेत. त्याकाळी रांझ्याच्या पाटलाने एक शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला उचलून नेलं आणि भोगली. राजाला ही गोष्ट माहीत होताच त्या पाटलाचे हात-पाय तोडले. १६७८ मध्ये सकुजी गायकवाड या सेनापतीनं २७ दिवस किल्ला लढलेल्या शत्रू सावित्रीबाईला सूड भावनेनं पाहिलं. त्याला त्याच किल्ल्यावर महाराजांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुसलमान शत्रूची तरणीताठी अन् देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अन् ‘आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते’ असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्यसंपन्नता आणि सोंदर्यसंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. मग वाचकासमोर हा प्रश्न उभा राहतो की सरंजामशाहीच्या काळातील न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था आणि लोकहीतवादी स्वराज्यनिर्मिती ही आजच्या लोकतंत्रातून श्रेष्ठ का?

    हल्ली शिवाजी म्हणजे कोणी ‘शिवाचा’ अवतार तर कुणी ‘विष्णूचा’ अशा अनेक गोष्टी पसरवण्यात आल्यात. पण कदाचित याचा विपर्यास होऊन एक सर्वसामान्य व्यक्ती कधी अवघड कामास पाऊल उचलणार नाही. त्याच करण म्हणजे, काही थोर काम करायचे असेल तर त्यासाठी देवाचा अवतार असायला हवं! आणि महाराजांना देवाच अवतार सांगून आपण पुढच्या पिढीला श्रद्धा-अंधश्रद्धा मध्ये ढकलत आहोत. महात्मा फुले इतिहाससंशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार व प्रचार करणारे कर्ते सुधारक म्हणून त्यांनी शिवाजीस ‘कुळवाडी भूषण वा शूद्राचा पुत्र’’ पोवाड्यात असे म्हटले असेल म्हणून त्यांचा पोवाड्याचा आधार दूर करता येणे शक्य आहे. रामदासाने शिवाजीला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडाक्याचे वाद आहेत.

    या गोष्टीला ज्याप्रमाणे समाजातील काही स्वार्थी प्रवृत्ती कारणीभूत आहेत, त्याचप्रमाणे समाजातील एक नागरिक म्हणून आपण देखील कारणीभूत आहोत. महाराजांवर उगाच वाद उकरून कोणीतरी उभा राहतो आणि आपण देखील त्यात आपलं ‘योगदान’ देऊन त्या वादाचं महत्त्व वाढवतो, त्याला प्रसिद्धी देतो. त्याचा परिणाम असा होतो की सत्तापिपासू लोक त्याचं राजकारण करतात. मुळात काहींनी इतिहास खरा मांडला तर काहींनी आपल्या सोयीनुसार इतिहासाची मांडणी केली. इतिहास प्रत्येक वेळेस खरं बोलेल वा प्रत्येक वेळेस खोटंच बोलेल असे मत मांडणे निरर्थक आहे. कधी एखाद्या घटनेला कोणी तेलं-मीठ लावून सांगू शकतो, आपल्यासमोर काल्पनिक घटनेला जिवंत रूप देऊ शकतो; ही त्या इतिहासकाराची शब्दाची ताकत म्हणावी लागेन, इतिहास नव्हे. भावनेच्या बळावर इतिहास टिकू शकत नाही. त्याला शास्त्रशुध्द पुराव्याची, संदर्भाची गरज असते. म्हणून महाराजांचं खरा आणि पुराव्यानिशी मांडलेल्या इतिहासाला समोर आणावा लागेल. त्याचबरोबर सोयीस्कर इतिहासापासून समाजाला वाचवावे लागेल आणि इतिहासाची विपर्यास पुनरौत्ती थांबवावी लागेल. शिवाजीराजे घोडीवर बसायचे की घोड्यावर? अशा प्रश्नामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा महाराजांच्या इतिहासातून चांगल्या आवश्यक गोष्टीचा संदर्भ घेऊन आजच्या समाजामधल्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करायला हवं. यासाठी आजच्या आणि पुढच्या पिढीने कोणत्याही महात्म्याला डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेणं अधिक योग्य ठरेल!

    राजेश राठोड

    टीप: पुस्तकाची pdf इंटरनेट वर free मध्ये उपलब्ध आहे…              

    28 April 2020

  • एकांतवास

    मी जरी काही क्षणासाठी प्रसिद्धच्या सिंहासनावर विराजमान होत असेल तरी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात मी घट्ट मिठी मारून बसलोय हेही परिस्थिने जाणून घ्यावे… मी शांततेचा, प्रेमाच, वात्सल्याच आणि माणुसकीचा सुगंध विश्वामध्ये प्रसार करण्याचं तोरण बांधतोय तर काळाला पटत नाहीये यावर मी काय करणार…

    जीवनाची होडी चालवताना होडी पाण्यात सामावून स्वतःच अस्तित्व नष्ट होणार नाही याची खात्री करावी लागते…

    खरंच,
    जीवन खुप ‘भन्नाट’ आहे…!!

    कोणी मला गोड बोलतंय म्हणून तो/ती माझ्या जवळची आणि कोणी माझे गुणगान गातंय म्हणून तो चांगला…
    हे ठरवणारा मी कोण?
    ते तस मला बोलणारे कोण?
    त्यांचं बोलणं स्वार्थी की निस्वार्थी?
    स्वार्थी नाहीस तर त्यागी कशावरून?
    ते सत्य तर मी असत्य का?
    वा
    मी सत्य तर ते असत्य का?
    मी मिस्किलपणाने हसलो तर मी त्यांची उडवतोय अस म्हणतात…
    आरे मी माणूस आहे…हसणं हे तुझ्या-माझ्या स्वभावातच लिहिलेलं आहे…

    मग ते माझ्या शाब्दिक अर्थाचा अनर्थ का करतायेत?
    मी माझ्याच चक्करमध्ये…

    अन त्यातही त्यांचे मौल्यवान शब्द…!
    आत्ता मला वाटतय…

    मी थोडं
            एकांतात राहिलं पाहिजे…
            एकांतात जगलो पाहिजे…
    फक्त
    @एकांतवास…!!

  • ढकल

    एक वास्तविक घटना…

    आज मी दाजी ला माजलगावच्या ‘योगीराज’ हॉस्पिटलमध्ये आईने पाठविलेला डब्बा देऊन अण्णाभाऊ साठे ओलांडून नवोदयचा रस्ता धरणार होतो…

    त्यावेळी काही शब्द कानावर पडले आणि अचानक बोट कॅमेऱ्यावर गेलं…

    मी काढलेल्या फोटोमध्ये काही विशेषता नाहीये परंतु त्या फोटोमागे माणसाच्या अनेक छटा लपून बसल्यात…

    बस स्टँडकडे मी या रद्दीच्या गाड्यासोबत चलत होतो… माझ्या ऐटीत…!!

    आकाशच्या कॉलमुळे पाऊलं जोरात पुढं सरकत होते. पण माझे श्रवनयंत्र पूर्णपणे काम करत होते. रद्दीवाल्या काकांच्या मागून एक गृहस्थ चालत होते. खूप घाई-गरबड होती त्यांना. काकांचीअवस्था, त्यांचं वय आणि या वाढत्या वयात भोगावी लागणारी परिस्थिती व त्यातूनच  मिटणारा पोटा-पाण्याचा प्रश्न… अश्या अनेक बाबीचा विचारी बोल, त्या गृहस्थाच्या मुखातून या अपेक्षावादी रद्द्यावर झडले.

    ”बाबा,अजून किती काळ ही म्हातारी गाडी ढकलनार?”

    आणि क्षणांतच ते गृहस्थ डोळ्याआड गेले. मी थोडा विचार केला. माझ्या कपाळावर पडलेल्या आठ्यावरुन त्या रद्दीवाल्या काकांनी एक ओळ सांगितली.

    ”बेटा, ही गाडी ढकलली नाही तर गाडी पुढे जात नाही…!”

    मला त्यांच्या गोष्टीमध्ये काही खास वाटलं नाही म्हणून थोडं पुढे निघालो पण क्षणार्धात माझे पाऊलं जागी थांबले आणि बोटं कॅमेऱ्यावर गेली.

    त्यांनी माझ्या डोक्यात प्रकाश टाकल, आणि आयुष्याचे काही महत्वपूर्ण धडे दिले.

    जीवनात पुढे सरकाव लागतं… मग ती रद्दीची गाडी असो वा आयुष्याची घडी…!!आपलं पोट ,आपण आहोत त्या जागी थांबू देत नाही आणि  जाणून-बुजून थांबलोत तर पोटात कावळे ओरडल्याशिवाय राहत नाहीत…त्यामुळे पुढे चलावच लागतं;लागणारच…!आयुष्याची गाडी आणि रद्दीची जोडी पुढच्या जीवनाची दिशा दाखवते.त्यांनी सांगितलं, हा गाडा एका जागी थांबला तर तो हाल-चाल करायला लागतो.नाही त्या दिशेकडे ओळाय लागतो. या दिशाहीन समुद्रात नाहीसा होतो.

    आजच पाच रुपयांचं एक पेपर उद्या पाच रुपये किलो न विकला जातोय…!

    तूच सांग,ही म्हातारी गाडी पुढं ढकलू की नाही?

    मंगळ; 18/06/2019

  • प्रश्न

    एकदा तिने मला प्रश्न विचारलं…

    तू दुसऱ्यासारखं हसत-खेळत दिसत नाही रे, या मागे काही रहस्य आहे का?

    सगळ्यात अगोदर माझ्याबद्दल कमीत-कमी कोणीतरी विचार करतंय, म्हणून माझ्या मनात चांदण्या चमकल्या…!!

    तिच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर किती आवश्यक होतं, हे तीच जाणे… पण हा सवाल माझ्यासाठी युधिष्ठिराला विचारलेल्या यक्ष-प्रश्नापैकी एक होता.

    आरे मी पण तुझ्यासारखं मानवी मूर्त-अमूर्त सजीव प्राणी आहे. कोणाला पांढराशुभ्र चंद्र दिसतो तर कोणाला त्या स्वेती चांद्रवरच काळा धब्बा!

    काळानुसार निसर्ग बदलतो आणि निसर्गानुसार माणूस… निसर्ग, नियतीने निर्माण केलेल्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मानवाला सूचित करतो… त्यानुसार तो दिशा दाखवतो…

    परंतु अश्याच वेळी, मानव चक्रातून बाहेर पडण्याऐवजी चक्रात आपल्या अस्मितेचा घर बांधतो. आणि याच घरामध्ये तो बेडकसारखं गोल चकरा मारतो…

    हेच त्याच अश्व,

    हेच त्याच विश्व…

    तुझ्यात अन् माझ्यात काही भेद आहेत…

    आचार व विचार हे आपल्या मध्यस्थी आहेत…

    तू त्या स्वर्गरुपी कल्पत्या विश्वाची महाराणी आहेस आणि मी  निसर्गाच्या बोलावर डोलणारा सर्वसामान्य अश्वमेघी नंदीबैल!

    तुम्हाला आनंद लुटता येतो, निसर्गाच्या देहबोलचा…

    आम्ही पुरोगामी विचाराचे परग्रही प्राणी.

    आम्हाला आनंद भेटतो;

       दुसऱ्याच्या दुःखात सामील होण्यात,

       त्या दुःखाचा भागीदार बनण्यात,

       अन्

       दुःख पचवण्यात…

    स्वतः काळोखात जीवन जगताना एक प्रकाशी किरण बनून जगात पसरलेल्या अंधाराचा नायनाट करण्यात आनंद भेटतो…

    मला दुसऱ्याच जीवन कला, साहित्य अन् संगीतात जगण्यात मजा येते… मजा येते मला मानवाच्या भावना-संवेदनामध्ये जगण्यात…

    मुळीच, माझी वाट कुसुमाग्री आहे… फ्रॉस्टीच दिशासुचक काव्य माझ्या नसा-नसात भिनलय…

    ‘या मानवी सुख-दुःखाची, आशा-आकांक्षेची वेणी घालावी’ असं माझ्यातलं माणूसपण मला सांगत होत…

    त्याचे बोल माझ्या हृदयात कोरले गेलेत…

    म्हणून;

          मला यशप्राप्ती नको, समाधानी जीवन हवंय…

          मला चमकते हिरे-मोती नको, तुझ्या डोळ्यातलं तेजस्वीपणा हवंय…

    मला तुझा ‘प्रश्न’ हवंय अन् तुझ्या प्रश्नार्थी माझं ‘राजयोगी’ प्रातिउत्तर…!!

    22 March 2019

  • प्रवास

    जीवन फार खट्याळ आहे. त्याचा नटखटपणा दुःखाच्या समुद्रावरून, सुखाच्या हिमालयावरून अन् क्षणिक वाळवंटी तर क्षणिक स्वर्गीय सहवास देतो.

    जीवनाच्या या अनंत चक्रातून बाहेर पडायला स्वप्नात जिद्द हवी आणि आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीमध्ये डोळ्यात डोळे विजयाच्या प्रतिमा बघण्याची हिम्मत हवी…

    तुमचा भूतकाळ तुम्हाला नीट श्वास घेऊ देत नसेल, तुम्हाला नीट जगू देत नसेल तर तुम्ही भाग्यवान आहात. ज्यांच्या भूतकाळामध्ये रक्तबंबाळाची निशाणी आहे, त्याच्या भविष्यामध्ये शौर्याची गौरवगाथा असते हे कदापि विसरू नये…

    तथापि भूतकाळाचा बाऊ करता-करता वर्तमानाचा अपमान करणे योग्य नव्हे.

    त्यामुळे आतां;

                    जागं होवाच लागेल…

                    इतिहास घडवावाच लागेल…

                    प्रवास सुरु करावच लागेल…

    प्रवास…

    प्रत्येकाचा प्रवास आईच्या गर्भशायतच सुरू होत असतो. तो गर्भ विविधतेने नटलेल्या साम्राज्यात येण्यासाठी उत्सुक असतो, आतल्या-आत धडपड जोरात असतो. ‘गर्भ’ स्वर्गापरी असतो असं म्हणण्यात जराही अतिशयोक्ती होणार नाही.

    अशा प्रवासाची चोफेरी सफर धन-दौलत, गरिबी-श्रीमंती, न्यायी-जुलमी, स्वार्थी-कपटी, मृगजळी वळणावरून होत असते.

    पुढच्या प्रवासात मी-तू-ते-तो-ती असे अनेक जण जन्माला येतात

    जीवनाच्या अथांग प्रवासात अनेक लोक सोबतीला येतात.त्यामधले काही लोक वेगळ्या दिशेला जातील.त्यांच्या मस्तकामध्ये परिस्थितीने निर्माण केलेल्या विचारांवर त्यांचा प्रवास चालू राहील. ‘सोबतीच्या’ प्रतिज्ञेला घट्ट मिठी मारून बसण्यात काही अर्थ नाहीये.वेळ आल्यावर प्रतिज्ञेला राम-राम ठोकून क्षितिजकडे स्वारी घ्यावी लागते.

    मानवी स्वभाव आणि आदर्श विचारधारा कृतार्थापासून रोखू शकत नाही. त्यामुळेच स्वतःची पाठ कणखर ठेवून उन्हा-तानात, थंडी-पावसात प्रवास करण्याची सवय असावी लागते.

    निसर्गाने निर्माण केलेल्या नियतीला नमस्कार करत आत्मशोधी अमृतासाठी खडतर काटेरी वळणावर चालावच लागतं.

    हा ‘प्रवास’ कदाचित आयुष्याला कलाटणी देऊन विजयाची तोरण बांधण्यासाठी अतुरावस्थेत घड्याळाचे काटे मोजतोय.

          “होऊ आता आवासी…

           चकरा मारुया कैलाशी…

           आळलेल्या पाषाणातून तेल काढणारा,

           म्या प्रवाशीमंत सम्राटी!”

    सोम; 07/01/2019

    शनि; 27/01/2019

  • आक्रोश

    मी ‘बैचेन’ झालोय…

    माझ्या हृदयात पेटलेल्या आगीला काही सीमा उरली नाहीये…

    माझ्या

        संपूर्ण देहात विचारच चक्रीवादळ सुरू झालाय…

        रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये ती आग सळसळतेय…

        प्रत्येक श्वासा-श्वासामध्ये आक्रोश तुडुंब भरलंय…

    आवती-भोवतीच्या जंगलाला विषमतेचा वानवा लागलाय…

    होय,

         आज माझ्या ‘आत्मक्लेषी’ समुद्राला पूर आलाय…

    काही लोकांच्या हालचाली माझ्या डोळ्याने कैद करून ठेवल्यात…

    त्या लोकांपैकी पसरलेल्या आगीवर कोणी रॉकेल टाकतय,

                                                         कोणी पेट्रोल

                                                         तर

                                                         कोणी डिझेल…

    ज्यांच्या हातात अग्निक्षमक दल आहे ते अजूनही निद्रेतच आहेत…

    ज्वालाग्रही परिस्तिथी तंबाकुप्रमाणे  माणसाला चोळतेय…

    त्यांची अमानवीय वैचारिकता अनेकांचं घर उध्वस्त करतेय…

    अन् मी

    मानवतेच्या नावावर काळोकट्ट दगडी रूप धारण करून स्वातंत्रतेचा निर्जीव,अबोल पुतळा बनलोय…

    या जळत्या जागाच दृश्य बघण्यासाठी काळाने मला 3-D चष्मा दिलंय…

    सोबतीला माझ्या पौरुष्याच्या नायनाटासाठी

    माझी जीभ अर्धी कापुन कुत्र्याला खायला टाकलीय…

    माझ्या डोळ्यात सुरे खुपसलेत…

    माझे हातकडीने हात अन साखळीने पाय बांधलेत…

    आता मी तोतरं बोलतोय म्हणून ‘पागल बोज्यांची’ उपमा परिस्थितीने माझ्यावर लादलीय…

    नकोय मला तुमच्या उपमा…

    नकोय मला हा तुमचा अमानुष कळश…

    मी

        माणुसकीचा शिल्पकार

    अन

        स्वतंत्र विश्वाचा कर्णधार…!

    मला तुम्ही ‘क्रूर’तेची लाच देऊ नको…

    माझा शिरच्छेद केलात तरी तू माझ्या देहाला शांततेचे पताके उंच गगनात फडकविण्यापासून रोखू शकणार नाहीत…

    म्हणूनच मी धिक्कार करतो

                                        तुमच्या आचरणाचा…

                                        तुमच्या लाचारपणाचा…

                                   अन

                                        तुमच्या विचारांचा…

    घृणा वाटतेय स्वतःची…

    माझ्यापासून तुम्ही दूर व्हा…

              नाहीतर

                       तुमचा अंत इथेच करेल…

                       वर्तमान तुम्हाला त्याची साक्ष देईल…

    अन्

          इथेच तुमचा मृत्यू मी माझ्या ‘राजयोगी’ कलमाणे लिहिणं…

         त्यामुळे तुम्ही दूर व्हा…

                            दूर व्हा…

    22/12/2018

  • एक जग, एक रात्र

    “गावात लाईट नाहीये… सर्वत्र काळोकट्ट अंधार पसरलाय… रातकिडे आपल्या सवंगड्याबरोबवर निरभ्र शांततेचा भंग करताय तर आभाळात चांदण्या आपले डोळे उघडे-झाक करत गुलाबाच्या फुलवरच्या दवबिंदूला हिऱ्याच मुलामा देण्यास सज्ज झाल्यात… चंद्र छोट्या पाळण्यातल्या बाळाच्या स्मितहास्यासारखं गालातच खुदकन हसतंय…

    आपल्या अस्तित्वाची सूचना काळोख्यास देण्यासाठी कुत्रे भोंकताय… आमची म्यांऊताई उंदिराच्या बिळ्यांचं काटेकोरपणे रक्षण करताय आणि मी आपलं विस्कटलेल्या शब्दांची माळ करत तुला पत्र लिहतोय…”

    ‘असं कसं हे विश्व?’ हा मला, याला, तुुला अन त्याला पडलेेलं पेच…!!

    मी शोधतोय याचे उत्तर… माणसाच्या ह्रदयात. माणुसकीच्या नात्यात… प्रेमाच्या प्रवाहात… आणि साहित्याच्या अत्तरात…

    प्रवास एकांताचा…

    शोध स्वतःचा…

    स्वतःच्या सावलीमध्ये… भेटेल का मला उत्तर आणि त्याच प्रतिउत्तर….!!

    ✍ राजयोग

    21/12/2018

  • नोटबदली

    8 नोव्हेंबर 2018

    माय, सरकारनं नोटबंदीच दोन वरश्यपूर्वी लावलेलं झाड आज सुकून गेलंय…

    मी त्याचा बड्डे हाय म्हणून लेमनच्या गोळ्या अन चार पार्ले बिस्केट घेऊन गेलते.

    मनाला खूप दुःख झालं.

    माझ्या डोळ्याला आवरता आलं नाही…

    मी धो-धो रडू लागले…

    सरकारनं तुझ्या-माझ्या जनतेला किती अपेक्षा दिल्या…त्यांची फळं फार गोड अस्त्यात म्हणे अन त्याची घनदाट सावली सरकारी ए.सी.पेक्षाही गार असते…

    आम्ही त्याची हवा खाणार होतोत पण काळ बदलला; आमच्या तोंडातलं आलं…

    असो…

    माझ्या मनात विचार आलंय.

    तुम्ही सगळे ‘नोटबंदी’ वृक्षाकडे या; बिना केकच… मी इथंच हाय… आपुन पिंट्याच्या दुकानावरून मेणबत्त्या घेऊयात अन सरकारनं रचलेल्या ‘नोटबंदी’ कार्यक्रमात मृत्यूच्या चक्रात अडकलेल्या वाटसऋणा श्रदांजली देऊयात…

    आणि भविष्याने ‘आम जनतेचं नुकसान होणार’ याची धोरणं आखावीत… काळावर ‘नुकसान भरपाई’चे घोषणपत्र लादू नये…

    परिस्थितीने आपल्या माणसांना आपल्यापासून वेगळं करू नये अन माझ्या ‘राजयोगी’लेखणीला माझ्यापासून…!!

    दोन वर्षे उलटल्यावर सरकारचं ‘मराठी ग्रामर’ अजूनही बल्यावसतेत आहे…

    मी ‘नोटबंदी’ऐवजी ‘नोटबदली’च नाव सुचवलं… म्या, लयं ‘आपलिकेशन’केल्या पण ती बहुर्मुखी सरकार आपलं ऐकत नाय अन स्वतःला ‘लोकसेवक’ समजणारे आपले नेतेही…

    बस्स, आता म्या लयं थकले गं…

    नको नादीला लागायचं…त्या ‘चार कोडी राजनीतिच्या’…!!

    #हल्लाबोल

    ✍राजयोग

    21/12/2018

  • प्रिय पिल्लु

    प्रिय पिल्लु

    प्रिय पिल्लु,

                तु पाठवलेलं पत्र काल माझ्या हाती लागलं.
    मन खुप भावनांनी भरून आलं…
    अनेक दिवसापासून मनात दाटून बसलेल्या संवेदना जागृत झाल्या…
    शब्दाचं उद्रेक फुटलंय…
    मी तसा लेखक नाहीये आणि उपदेशकही; मी स्वतंत्र विश्वाचा स्वाधीन प्राणी आहे. माझं दिशासुचक निसर्ग आणि मार्गदर्शक निसर्ग यांच्या दुहेरी गाठीतून निर्माण झालेलं भावी मार्ग…
    व ज्या लोकांमुळे माझी जगण्याची उमेद आहे ते सर्व तुम्ही माय-बाप.
    शाळा सोडून काही वर्ष उलटली आहे. बाहेरच जग हे राग, द्वेष, मत्सर, करुणा, सहानुभूती आणि ‘मी’पणा यांनी जखडलेलं असुन समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या मूल:ततत्वावर उभी आहे…

    या सर्व गोष्टीचा तुझ्या आणि माझ्या वैयक्तिक जीवनाशी काहीही घेणं-देणं नाहीये, परंतु एकविसाव्या शतकाच शंक पुकारण्याअगोदार, तू-मी या विश्वाचं एक अंग, या समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपल्या जागाच रहस्य आपल्याला उमगण महत्वाचं ठरतं. तू उगवत्या राष्ट्राच भवितव्य आहेस म्हणून,तुला दीर्घपत्र लिहावं, असं मला आपल्या ‘सरकार’न सुचवलंय…!

    पिल्लु, तु सध्या शाळेच्या चार भिंतीमध्ये सुखरूप आहेस. उद्या शाळेमधून बाहेर पडल्यावर तुला एकपात्री नाटक जगायचं. या जगासाठी आपण ‘कुटपुतली’आहोत. जगाला आपल्या सुख-दुःखशी काहीही देणं-घेणं नाहीये; हे वर्तमानाच कटुसत्य आहे. त्यांना फक्त ‘तुझा-माझा’ नाटक बघायचंय. म्हणून पिल्ल्या, तू स्वतः सुखी असल्यावर दुःखी माणसासमोर स्वतःच आनंद द्विगुणित करू नको आणि संकट कोसळल्यावर स्वतःच धैर्यवान जीवनपर्वत कोसळू देऊ नको रे. स्वतःच्या सुख-दुःखाचा तराजू स्वतःच्या हातात घेऊन पुढे चालत राहा…

    कधी-कधी मला लोक सांगतात; ‘तात्या,तू खूप छान बोलतोस, वागतोस, तसा राहतोसही’. अश्या कोकीळ मंजुळीवर मला खूप हसू येतंय. पिल्ल्या, मी तर या निसर्गाचं Product आहे. मी फक्त अण्णांनी दाखवलेल्या पाऊलवाटेच रूपांतर चार पदरी रस्त्यात करतोय, यात नवीन असं काय? अण्णाला रस्त्यावर काटा दिसला तर ते बैलगाडीतून खाली उतरायचे अन  काटा बाजूला काढायचे. त्यांच्या अशा अनेक गोष्टीबद्दल पूर्वी मला पेच पडायचा. शेतात काम करून त्यांचे पाय ‘खटारा’सारखे रट्ट झालेले होते. मुळात, ‘दुसऱ्यांना काटा टोचू नये’ अशा अनेक समाजसेवी भावनेचा जन्म त्यांच्यात कसा झाला? ‘याचा शोध घेताना मला त्यांच्या जीवनशैलीचा अनुभव घेता आलं.

    अरे पिल्ल्या, त्या व्यक्तिमत्वाच्या हृदयात ‘तु-मी’ नव्हतं तर आपल्या सारख्या प्रत्येक माणसाबद्दल सहानुभूती होती. ते रंग, जात, लिंग, धर्म यावरून भेदभाव करत नव्हते. त्यांच्यासाठी ‘तुम्ही जगासाठी कोण आहात? ‘हे महत्त्वाचं नव्हतं तर ‘पैसा’ सोडून तुमच्याकडे असलेल्यापैकी ‘जगासाठी काय-काय देऊ शकता?’ आणि यावरून ते व्यक्तीच अवलोकन करायचे. ते ज्ञानी लोकांना मन-सन्मान द्यायचे. त्यांनी अज्ञानी लोकांना एकत्रित करून ‘विद्या विनयेन शोभते’या अद्याक्षराद्वारे व्यवहरिक ज्ञान प्रचाराची मुहूर्त रोवली. हे सर्व सांगण्यास कारण कि, या सर्व नैतिक मूल्यांची ‘बीज’ अण्णामध्ये विद्यार्थी दशेत असतानाच रोवली गेली. हल्ली, मी पण त्यांचं अनुकरण करतोय. माझी इच्छा आहे कि, बाहेरच्या कपोलकल्पित जगामध्ये जगण्यासाठी अण्णांनी सांगीतलेलं ब्रम्हास्त्र तू बाल्यावस्थेत असतानीच तयार करून ठेव. कदाचित, तिसऱ्या महायुद्धाच्या वेळी जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हेच माणुसकीचे धडे तुझ्या कामी येईल. त्या युद्धमैदानावर तुझे ‘शब्दच’ अनेकांचं शिरच्छेद करतील.

    विशेष म्हणजे, जेव्हा तू यश संपादन करशील, तेव्हा तुझ्या विजयाचे पताके अस्मानात फडकू दे व तुझे सुवर्ण पाय जमिनीवर असले तर अधिक उठून दिसतील यात शंका नाहीये…
    या यशोगाथेच्या प्रवासात पिल्लू तुला अपयश आलं तर कधीच खचून बसू नको; कारण ज्या व्यक्तीचा तुझ्यावर विश्वास आहे त्यांना तुझ्या स्पष्टकरणाची गरज नसते आणि ज्यांना तुझ्यावर विश्वास नाहीये, त्या लोकांना तुझ्या स्पष्टकरणासाठी काहीही किंमत नसते. त्यामुळे या बहुरूपी दुनियेत तुला स्वतःच दिवा स्वतःच पेटवायचं आणि त्या दिव्याच्या प्रकाशात स्वतःच जीवन प्रकाशमय करून जगामध्ये पसरलेल्या अंधाराला नष्ट कारण्यासाठी तुलाही हातभार लावायचं, हे विसरू नकोस…!!

    पिल्ल्या, बाहेरची चंगळवादी दुनिया फार मतलबी आहे रे! या दुनियेमध्ये जोपर्यंत तू चमत्कार करणार नाहीस तोपर्यंत तुला कोणीही नमस्कार करणार नाही. ‘शिक्षण’ हे एकमेव साधन आहे, जे पैश्याला कमी अन् माणुसकीला धार-धार करत. आपल्या भाऊने शाळेमधून बाहेर पडल्यावर पैसे थोडेच कमविले रे; परंतु त्यांनी माणसाची शिदोरी बांधलीय. ती अजूनही तशीच आहे… तीच त्यांची खरी संपत्ती. खरं सांगतो, तुझ्यासाठी तुझे classmates, seniors आणि juniors हे कोहिनूरच्या हिऱ्याहूनही अधिक मौल्यवान आहेत. पैसा काळाची गरज आहे आणि पुढे भविष्यात तुला पैश्याची गरजही भासणार आहे… बेटा, तू पैसा जरूर कमव रे पण पैसे कमवितानी तुझ्यात असलेली मानवतेची आग कदापि विझू देऊ नको… ती ज्वलंत आग पुढे कमी येणाय आहे. एके वेळी पैसे नसले तरीही चालेल पण स्वाभिमानाने उंचावलेली तुझी मान कधीच खाली येऊ देऊ नको. शाळेने तुझ्यात निर्माण केलेल्या स्वाभिमानाची तुलना पैशासोबत करून स्वतःच आयुष्य उद्धवस्त करू नको…

    या लोकतांत्रिक देशामध्ये प्रत्येक क्षणाला संविधान तुझ्या डोक्यात असणं गरजेच आहे, म्हणून उद्या लिब्ररीमध्ये जा आणि भारताचा संविधान वाच. त्याचं आदर करणं, त्याची मूल्य जपणं हे तुझं उत्तरदायित्व आहे. जगात असत्याच्या मार्गाने काम करणाऱ्या आणि चालविणाऱ्या लोकांना तुझ्या सत्यवादी संविधानी चाबुकाची गरज हाय रं! त्यामुळे तू आतापासूनच वेळेचं नियोजन करायचं शिक. ‘गेलेली वेळ परत येत नाही’ याचा अर्थ ‘त्या वेळेत खर्च झालेलं आयुष्य परत येणार नाही’ असाही होतो. घड्याळाचा टिक्-टिक् करणारा काटा ‘आयुष्य दिवसेंदिवस उलटून जातंय’, हा संकेत देत असतो.
    पिल्लु, मृत्यू अटळ आहे.
    प्रत्येक क्षण हा मृत्यूच्या द्वारी घेऊन जाणारा आहे.सकाळच्या वेळी ‘राम-राम’ करणारी मंडळी ‘राम नाम सत्य है।’ याची संबोधनात्मक सूचना देत असतात.

    एके दिवशी आपण सर्व मृत्यूच्या चक्रव्युव्हामध्ये अडकून मातीसामान होणार आहोत. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे. भूतकाळाकडे वळून पाहिल्यावर ‘आपण जीवन जगलो आहोत’ असे उद्गार इतिहासाने काढावे म्हणून भविष्याची रचना नवोदयमध्ये असतानाच करून ठेव. मुळात जीवन हे सुंदर आहे की वाईट हे matter करत नाही तर तुझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन matter करतो, हे कदापि विसरू नको. निसर्गाने सर्व लोकांना सारखं आयुष्य दिलंय. आयुष्याच राख करायचं की सुवर्ण अक्षराने इतिहासाच्या पानोपानी अजरामर होऊन जायचं, हे आपल्या हातात असतं रे.
    तुझ्यावर कधी वाईट अवस्था येईल त्याच बाऊ करणार नाहीस याची मला हमी दे. चिमण्या, तुझ्या वाईट अवस्थेहुनही तुझा संघर्ष मोठा असला पाहिजे. ‘परिस्थितीला संधी समजून, तू त्याला तुझी ताकत कस बनवलसं?’ हे जाणून घेण्यासाठी भविष्य तुझी वाट पाहतोय. त्याला तू निराश करू नकोस…

    हल्ली, बाहेर प्रेमाचं वादळ सुरु आहे. प्रेम होणं किंवा प्रेम करणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. जेथे प्रेमाचा अंत होतो तेथे द्वेषाच राज्य उदयास येतात, या गोष्टी तू समजून घे. कथा-कादंबऱ्यामध्ये वाचलेलं प्रेम, चित्रपट-मालिकेमध्ये पाहिलेलं प्रेम, बाहेरच्या दुनियेमधलं ऐकलेलं प्रेम हे क्षणभंगुर आहे. या भ्रमाच्या दुनियेत जगू नकोस. तू प्रेम जरूर कर पण त्या प्रेमाला स्वार्थीपणाची झळक शेवटच्या श्वासापर्यंत लागणार नाही, याबद्दल तू सतत दक्ष राहा…

    आपल्याला किड्या-मकोड्यासारखं जीवन जगायचं नाही रे पिल्ल्या! त्यामुळे पुस्तकासोबत मैत्री कर, अफाट ज्ञानसागरावर स्वार हो. आपल्या आई-वडिलांनी भोगलेल्या परिस्थिचा उद्धार आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी शाळेच्या चार भिंतीमध्येच स्वतःच व्यक्तिमत्व निर्माण करावा लागेल…

    पिल्लु, भविष्यात तुझ्याकडे माझ्याहूनही जास्त ज्ञान असेल यात शंका नाही, पण तूझ ते अफाट ज्ञान ज्या वेळी तू मातृभूमीच्या विनाशाऐवजी विकासासाठी वापरशील त्यावर तू एक सच्चा ‘माणूस’ आहेस याच सार्थक होईल…

    मी मागे एके  ठिकाणी वाचलं होतं-

    “When you work for success, you become Ideal; but when you work for satisfaction, you become Legend…!!”

    असो.

    संपूर्ण विश्वासाठी तू-मी शून्य आहोत. मला माझ्या भविष्याची गुरुकिल्ली मिळालीय. आता, तुलाच तुझं विश्व शून्यातून निर्माण करायचयं. हे निर्माण करताना तू दुसऱ्याच्या पायावर कुऱ्हाड पडणार नाही, याबद्दल सचेत रहा आणि ज्यावेळेस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पडेल तेव्हा माझ्या ‘सरकार’चं वाक्य ध्यानात ठेव-

    “When one end of the pencil breaks then keep in mind that the other end is just waiting for you to create a beautiful world…”

    पिल्ल्या, आपल्याला ‘नितळ पाण्यासारखं’ आयुष्य जगायचं. भविष्यात मला तुझा हात हवाय. ज्यावेळी तू ‘राजयोग’ मुकुट परिधान करण्यासाठी सक्षम असशील त्यावेळी मी अख्या जगभर तुझे यशोद्वगार गाणार आहे. हे माझं secret प्लॅन आहे. तू कोणाला सांगू नको, बरं का…!!

    या सर्व गोष्टी केंद्रस्थानी ठेवून ‘एक सामर्थ्यवान व्यक्तित्वा’पासून तू कधीच विभक्त हिणार नाहीस, याच प्रतित्तर मला हवंय! पत्रावर माझ्या संपूर्ण पत्त्याची गरज पडणार नाही. फक्त ‘राजयोग’ टाकलस, तरीही पुरेस होईल… माझ्या लाडक्या ‘पिल्लू’च पत्र माझ्याकडे पोहचून जाईल…!!

    तुझाच काकोबा

    ✍️राजयोग