Category: Marathi Poem

  • प्रेमवाणी

    प्रेमक-प्रेयसीच्या प्रेमबोली आणि 143 हा प्रेमांक

    मला खूप खतरनाक वाटतो…

    अन्

    द्विअक्षरी ‘प्रेम’ हा शब्दही…

    आजची प्रेमदुनिया

    थोडी आगळीवेगळी,

                   थोडी विस्कटलेली,

                   थोडी बोधट

             अन्

                    थोडी प्रेमहिनही..

    त्याची अवस्था गोगलगायीप्रमाणे झालीय…

              गोगल गाय

              नाकात दोन पाय

              आवडलं तर बोल ‘हाय’

              नाहीतर

              आलं त्या वाट्यावरुन परत जाय…

    जगात प्रेमावर भाष्य करणारी अनेक मंडळी होती, आजही आहे आणि पुढेही असतील…

    तिकडे शेक्सपिअर, अस्तेन, करलोट, निकोलस यांनी धुमाकूळ घातलंय आणि इकडे     

              मीराच्या बोली,

              प्रेमाची खोली,

    अन

              प्रेमडोली…!

    हे सगळं मनाला हादरून टाकतय…

    आइन्स्टाईनने तर प्रेमातही सापेक्षतेचा सिद्धांत मांडलंय…!

    मागे दोन वर्षांखाली मराठी हस्य काव्यसंमेलनामध्ये प्रेमावर कविता सादर करण्यात आली…

    तीच पारायण मी मराठी भाषण कौशल्याअंतर्गत माझ्या वर्गात प्रस्तुत केलेलं आठवतंय…

    कवितेचे बोल-

            प्रेमात फार वेळा काय होत?

            प्रेम तिच्यावर करायचं

            घराभोवती फिरायचं(2)

            अन एके दिवशी

            तिच्याच लग्नात जेवायचं…

            अशी लग्न खूप जेवलो…

            अशी लग्न खूप जेवलो…

            कारण

            प्रत्येकीनं आग्रहाने निमंत्रण धाडली…

            निमंत्रयाबरोबर स्पेशल पत्रही पाठवलं…

            त्यात पुन्हा तीत

            लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन

            असं लग्न जमल्यावरही तिन्हे म्हणायचं

            मी फक्त

            प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेऊन

            ‘प्रेमा’च्या ढेकरा देत फिरायचं

            आणि

            अजून किती पत्रिका येतील,

            याच अंदाज घेत बसायचं…

            असे लग्न जेवता-जेवता

            दिवस असे सरत गेले

            अन् एके दिवशी तिच्या

            ढवाळ जेवणाचे आमंत्रण आले…

            आदी-मधी-कधी

            भेटलीच तर म्हणते ‘प्रिय करा'(2)

            आणि माझ्या बाळाचं

            बार्सही देखील जेवलं पाहीजे…

            प्रेमात फार वेळ असाच होतं

            प्रेम तिच्यावर करायचं

            घराभोवती फिरायचं

            अन् एके दिवशी

            तिच्या पोरानं मला ‘मामा’ म्हणायचं…!!

    असो…

    मला तर वाटतंय बुवा;

    जे रंगहीन, रुपहीन, देहहीन असतं, ते प्रेम असतं…

    ना त्याला कशाची भाषा,

    ना त्याला कोणाची आशा,

    ना कोणाकडून कशाचीही अपेक्षा…

    रंगात-रंग रंगाविणारे…

    सुरा-सुरात सूर लावणारे…

    इतिहासात इतिहास लिहिणारे…

    वर्त-भूत अन भाव्याचा काळ सांगणारे…

    त्यागात प्रेमाचं प्रतिबिंब बघणारे…

    कोलंबशी प्रेम-विश्व शोधणारे…

    असे दोन निःस्वार्थी, निष्पन्न, निष्पाप हृदय म्हणजे ‘प्रेमा’चे दोन मुळाक्षरे..!!

    प्रेमाला अंत नसतो…

    बस

        वेळेनुसार त्याला लपवता,

        दाबून ठेवता येतंय…

    काहीवेळेस प्रेमच नव्हतं असही बोलावं लागत…

    प्रेमात हसता येतं, रागावता येत आणि रडुदेखील…

    त्यात तुझे-माझे युद्ध देखील मोडतात…

    काळानुसार त्याला ‘अबोल-अर्धांगवायू’ देखील होतो…

    पण

    जेथे प्रेमाला ‘सामंजस्वा’चा मुलामा असतो, तेथे सुरकतलेल्या प्रेमाची ओजस्वीता पाना-फुलासारखी फुलते…

    बस,प्रेमाला फुलवणारी मन असावी लागतात…!

         मनाला-मन जोडणारे ह्रदय असावे लागतात…!

    अन्

         हृदयाला-हृदय जोडणारे माणसं देखील…!

    शेवटी,

    मंद झुळूक यावी…

    तुझी-माझी होडी, लांब वाहून जावी…

          आपण फक्त डोळ्यांनी बोलावे, जाई-जुईवाणी…

          हीच माझी प्रेमबोली आणि ‘राजयोगी’ प्रेमवाणी…!!

    23/12/2018

  • आतुरता

    आतुरता…

    तुला भेटण्यास आतुर झालो मी,   

    आतुर झाली वेळही…

    निश्चल, अबोल प्रेमाच्या लहरी,

    वाहून गेल्या माझ्या-वरूनही…!

    अतुरतेचे प्रश्न-उत्तर, घेतलेत हाती प्रेमसूत्र,

    अतुरतेचा हा अत्तर, वाहतयां सर्वत्र…!

    वाहतयां सर्वत्र…!

    12/12/2018

  • सत्य

    असत्याचा आभाव म्हणजे ‘सत्य’ होय…!!

    ‘सत्य’ हे प्रकाशासारखं बहुआयामी असतं.

    त्याच्यावर कोणाचाही प्रभाव नसतं.

    ‘सत्या’ला ‘सत्या’पासून वेगळं करता येत नाही.

    सत्य-असत्याला पैश्याने खरेदी करता येतं पण ज्या तेजाने काळ्याकट्ट अंधारात दिवा उजळून येतो, ती तेजस्विता त्याच्यात नसते.

    ‘आपल्या मुठीत सत्य-असत्य आहे’ या खोट्या भ्रमात खरेदीदार जगत असतो.

    एकीकडे सत्य मानवी स्वभावाला बोचत तर दुसरीकडे मानवी व्यक्तित्वाला सोन्या-चांदीच मुलामा देत.

    सत्य,

    अथांग समुद्रावर स्वार होतो…

    वाळवंटात निरंतर प्रवास करतो…

    चक्रीवादळातून स्वतःचा मार्ग काढतो…

    जमीन-अस्मान एक करतो…

    स्वर्ग-नर्क पालथं घालतो…

    श्रद्धा-अंधश्रद्धा एक करतो…

    जन्म-मृत्यू चक्रातून सुटतो…

    प्रेम-द्वेष्यावर आपला राजस्व गाजवतो…

    कैलाशी गाठतो…

    सत्यशोध करतो…

    आणि

    शेवटी,

            असत्याचा आभाळ फोडून;

            स्वतःच्या सत्य वदणातून सत्य उजागर करतो…!!

    26/11/2018

  • पूर्णविराम

    हृदयात लपवलेल्या भावना कालांतराने कोमेजून जातात…

    शेवटी त्यांचा आक्रोश होतो…

    दिशाहीन झऱ्याला पान्हा फुटल्यावर चहुदिशेला पसरतो,तश्याच या मानवी भावना पसरतात…

    सर्वत्र हाहाकार करतात….

    सहन केलेल्या गोष्टीना तोंड फुटतं…

    शब्द बाहेर पडतात…

    ते

    बहिरूपी धारण करतं…

    भावना,

    बोराटी-हिंगोरीच्या काट्याप्रमाणे भुतकाळाला बोचतात…

    वर्तमान मुका होतो…

    आणि

    भविष्य तळपत्या उन्हातान्हात थंड सावलीच्या शोधात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घोडं-प्रवास करतो…

    काळाने मानवतेला बांधलेल्या हातकड्या नष्ट होतात…

    पायावरच्या साखळ्या वितळून जातात…

    त्यालाही

              स्वातंत्र्य हवंय…

              उंच आभाळात भरारी घ्यायचीय…

              मैलोमेल चालायचं…

              तहान-भुकेने व्याकुळलेल्यानं भेटायचं…

              स्वप्न-स्वर्गातून वास्तविकतेमध्ये जगायचंय…

              आपलेपणाचा अनुभव घ्यायचंय…

    अन

             दोन अश्रू मानवी मातीला अर्पण करायचंय…

    आता,

    पूर्णविरामाच ‘कॉमा’मध्ये रूपांतर होतंय…

    जीवनाच्या,

                       या दुपायी रस्त्यावर;

                       स्वतःला सावरत,

                       परिस्थिला आवरत,

    ‘राजयोगी’ प्रवास पुन्हा सुरू होतो…!

  • पैसा (₹)

    पैश्या,

            तुझा जन्म ”सावधान,सावधान…!!”या मंगल अष्टमीने झालं…

    नंतरच्या काळात;

            त्वा,काही सावकाराच पोट भरलस तर कोणाची झोळी खाली केलीस…

                 मंदीच्या काळात तू खूप आग लावण्याचं अन विजवण्याचं काम केलंय म्हणे…!!

    हल्ली,पडद्याआड रूपाने लाच घेता येते आणि देतही येते…

    मी ऐकलंय बुवा,

               तू माणसाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधतो म्हणे…

               अन,

               लाचार पांढरी पट्टीदेखील…!!

    तू,

                कधी विक्षिप्त रूप धारण करून भन्नाट बोलतो

                तर,

                कधी निर्जीव मूर्तीसारखं अबोला प्राणी होतोस…

    कारे रे,

                 तू कधी विचार केलंस;

                 तुझ्यामुळे किती जणांचे नाते दुरावले.

                 काहींवर आरोप-प्रत्यारोप झाले.

                 तर काही स्वर्गवासी झाली.

                 काही जन्मले

                 अन

                 मेलेही…

     तुला; माणसासारखं, मृत्यू नाही का रे?

              त्यांच्यासारखं, मातीमध्ये मिसळून जाण्यासाठी…

     माणसं, मृत्यूनंतर मातृभूमीला कवटाळतात…

                 त्यावेळी,दोन्ही निर्जीव असतात…

     माणसं, तुला इतकं प्रेम कसकाय करतात रं?

                  एक निर्जीव

                  तर

                  दुसरं सजीव…

    खरंच… तुमचं लग्न लावावं लागतं…

                सावधान,सावधान म्हणत…

    अरे पैश्या,

                माणसाला अंत आहे…

                पण

                तुला नाही का…अंत??

    21/08/2018